BULDHANA NEWS : अस्वल पाहून वाहनं थांबवली, झुडपात शिरलेलं अस्वल अखेर…

| Updated on: Aug 06, 2023 | 9:56 AM

अस्वल पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटल्याची घटना काल बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. अस्वलाच्या भटकंतीमुळे तिथले स्थानिक अधिक भयभीत झाले आहेत.

BULDHANA NEWS : अस्वल पाहून वाहनं थांबवली, झुडपात शिरलेलं अस्वल अखेर...
buldhana malkapur
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश सोलंकी, बुलढाणा : एखादा जंगलातील प्राणी अचानक समोर आल्यानंतर अनेकांना घाम फुटतो. अचानक अस्वल समोर आल्यानंतर आता नेमकं काय करायचं ? काल असाचं प्रश्न बुलढाणा (buldhana bear news) जिल्ह्यातील काही व्यक्तींना पडला असेल. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (buldhana malkapur) मार्गावरील बुद्ध विहारसमोर अस्वल भटकंती करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला आहे. त्यामुळे परिसरातील लोकं अधिक भयभीत झाली आहेत. ज्यावेळी काल लोकांना अस्वल दिसलं. त्यावेळी लोकांनी त्या अस्वलाला आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे. विशेष म्हणजे त्या परिसरात यापुर्वी देखील अशा पद्धतीचे प्राणी पाहायला मिळाले आहेत. अस्वल पाहण्यासाठी लोकांनी काल रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तिथं येण्यास विलंब झाल्याची माहिती बघ्यांनी सांगितली.

बुलडाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटाजवळ असलेल्या महाबोधी विहार परिसरात एका अस्वलाचा मुक्त संचार सुरु आहे. काही नागरिकांनी अस्वलाला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे. मात्र यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून सायंकाळी आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांत सुद्धा भीती पसरली आहे.

बुलडाणा शहर अजिंठा पर्वत रांगेवर वसलेले आहे. बुलडाणा शहराला लागून असलेल्या पर्वत रांगेत राजूर घाट असून याच घाटातून बुलढाणा ते मलकापूर हा रस्ता जातो. या परिसरात बिबट्या, अस्वल, तडस सारख्या हिंस्त्र प्राणी अनेक नागरिकांना दिसले आहेत. हे प्राणी या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आपले दर्शन देत असतात. काल सायंकाळी महाबोधी विहार समोर एक अस्वल काही नागरिकांच्या दिसलं.

हे सुद्धा वाचा

रस्त्याने जाणारी अनेक वाहन थांबल्याने मोठी गर्दी जमली होती. वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत अंधार झाला असल्याने अस्वल एका झुडपात जाऊन बसलं. यावेळी वनविभागाने गर्दी हटवली असता काहीवेळा नंतर अस्वल जंगलाच्या दिशेने निघून गेले.