Buldhana : पायाला ठेच लागली अन् विहिरीत पडले, दोरीला पकडून काढले पंधरा तास, नंतर जे काय घडलं…
बुलढाण्यातील केशवनगरमध्ये राहणारे अनंत गायकवाड हे रात्रीच्या सुमारास मोताळा तालुक्यातील सेवागिरी बाबांच्या आश्रमामध्ये निघाले होते.
संदीप वानखेडे, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात विचित्र घटना घडली आहे. रात्री लघुशंकेला जात असताना ठेच लागली अन् व्यक्ती थेट विहीरीत (well) पडली. त्याचवेळी विहीरीतील दोरी हाताला लागली, आणि त्या इमसाने रात्र विहिरीत काढली. पंधरा तासानंतर त्यांना विहीरीतून बाहेर काढण्यात आलं. ज्या पोलिसांनी त्यांची सुटका केली, त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे ते सेवागिरी बाबांच्या आश्रमामध्ये (Sewagiri baba Aaharam) जात असताना हा अपघात घडला आहे.
बुलढाण्यातील केशवनगरमध्ये राहणारे अनंत गायकवाड हे रात्रीच्या सुमारास मोताळा तालुक्यातील सेवागिरी बाबांच्या आश्रमामध्ये निघाले होते. त्यावेळी सबस्टेशन जवळ लघुशंकेसाठी थांबले होते, मात्र त्यांना ठोकर लागल्याने ते एका विहिरीत पडले, आरडाओरड करूनही कोणी येत नव्हतं. त्यानंतर रात्रीच्या अंधारात अचानक त्यांच्या हाताला विहिरीतील दोरी लागली. दोरीला पकडून त्यांनी संपूर्ण रात्र विहिरीत काढली.
मात्र याची माहिती ठाणेदार बळीराम गीते यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून अनंत गायकवाड यांना सुखरूप विहिरीतून बाहेर काढले, यामध्ये अनंत गायकवाड हे किरकोळ जखमी झाले आहेत.