शिक्षक नुसते पगार घेण्यासाठी आहेत का ? पालकांचा गंभीर प्रश्न

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालकांच्या गंभीर आरोपामुळे शिक्षक अधिक चर्चेत आले आहेत. यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

शिक्षक नुसते पगार घेण्यासाठी आहेत का ? पालकांचा गंभीर प्रश्न
buldhana teacher late schoolImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 9:54 AM

गणेश सोलंकी, बुलढाणा : शाळेच्या वेळेत शिक्षक (buldhana school news) हजर न झाल्याने पालकांनी शिक्षकांना चांगलेचं धारेवर धरले असल्याची चर्चा संपूर्ण बुलढाणा परिसरात पाहायला मिळत आहे. शनिवार असल्याने साडेसात ऐवजी शिक्षक आठ वाजता आल्याने पालकांनी शिक्षकांना जाब विचारला. त्याचबरोबर विद्यार्थी शाळेच्या गेटवर ताटकळत उभे राहिल्याने पालकांचा पारा चांगलाचं चढला होता. बुलढाणा (Buldhana news in marathi) येथील गांगलगाव (gangalgaon) येथील हा प्रकार असल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षक नुसते पगार घेण्यासाठी आहेत का ? असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

विद्यार्थी हे शाळेच्या गेटवरच ताटकळत उभे होते

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या गांगलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आज शनिवार असल्याने सकाळी साडेसात ऐवजी आठ वाजता शाळेत दाखल झाले. तोपर्यंत विद्यार्थी हे शाळेच्या गेटवरच ताटकळत उभे होते अशी माहिती पालकांनी सांगितली आहे.

पालक शाळेसमोर जमा झाले

शिक्षक आले नसल्याचा प्रकार पालकांच्या लक्षात आला, त्यानंतर पालक शाळेसमोर जमा झाले असता. आठ वाजता चार पैकी दोन शिक्षक शाळेत आले आणि उपस्थित पालकांनी या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. तर चार पैकी दोन शिक्षक अद्याप ही आठ वाजून गेल्यानंतर ही आले नव्हते.

हे सुद्धा वाचा

शिक्षक नुसतेच पगार घेण्यासाठी आहेत का ?

त्यामुळे शिक्षक नुसतेच पगार घेण्यासाठी आहेत का ? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षकांच्या या दांडीमुळे गांगलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता या दांडी बहाद्दर शिक्षकांवर वरिष्ठ काय कारवाई करतात ? याकडे पालकांचं लक्ष लागले आहे.

शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता

शनिवारी सकाळी शाळा असते, हे शिक्षक विसरले असल्याची सुध्दा पालकांमध्ये चर्चा होती. शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक सुध्दा भयभीत झाले आहेत.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.