‘जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही, आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते हे याला कोणी सांगितले’, छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर तोफ डागली

Chagan Bhujbal Attack on Manoj Jarange Patil : ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही, असा टोला त्यांनी शेगावमध्ये लगावला.

'जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही, आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते हे याला कोणी सांगितले', छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर तोफ डागली
छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 3:13 PM

ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा संघर्ष उडण्याची शक्यता आहे. भुजबळांनी आज शेगावमध्ये जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते हे याला कोणी सांगितले, असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला. जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही, असा चिमटा पण त्यांनी काढला. माळी समाजाच्या कार्यक्रमानिमित्त ते बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये आहेत.

मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही

छगन भुजबळ यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले. पण अद्याप आपण खचलो नाही, अजून लढाई संपलेली नाही. आपण लढत राहणार असल्याच्या भावना त्यांनी शेरोशायरीतून व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

जसा इतर समजला सरकारकडून शिक्षण सह इतर साठी पैसा मिळतो तसा ओबीसी समाजाला मिळत नाही, असे ते म्हणाले. मी मराठा समाजा विरोधात नाही. पण त्यांना वेगळे आरक्षण द्या, एव्हढेच म्हणणे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला तर मी पाठिंबा दिला, असे ते म्हणाले.

मनोज जरांगेंवर हल्ला

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जालन्याचा गडी ऐकायला तयार नाही. नक्कल करत आहे . माझ्या लेकरा बाळाना द्या म्हणत आहे. आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते याल कोणी सांगितले, असा टोला त्यांनी लगावला. ज्याप्रमाणे ५८ मोर्चे मराठा समजायचे निघाले तसे गुजरातमध्येही पाटीदार समाजाचे मोर्चे निघाले. त्यांना १० टक्के आरक्षण दिले. साडे आठ टक्के दिले. त्यांची आंदोलने थांबली मात्र यांची आंदोलन सुरू आहेत.

लढाई संपलेली नाही

बीडमध्ये क्षीरसागर यांचे घर जाळले, त्यांच्या घरातील सर्वांनाच त्रास झाला. घरात लहान लेकरं होती. त्यांना मुस्लिम समाजातील मुलांनी वाचविले. आमचे कार्यकर्त्यांचे घर जळले, हॉटेल जाळले, प्रकाश सोळंके यांचे घर जाळले. अनेक ठिकाणी गट तयार होते. प्रत्येक गटाला कोड ठरलेला होता, असा आरोप भुजबळांनी केला. ओबीसींवर हल्ले करण्यात आले. लढाई संपलेली नाही, ती सुरूच असल्याचे भुजबळ म्हणाले.

'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.