पोहरादेवीत मुख्यमंत्र्यांचा दौरा, महंत सुनील महाराज नाराज; नाराजीचं कारण काय?
निधी वाटपाच्या धोरणात पक्षपातीपणा करण्यात आला आहे. जगदंबा देवी बावनलाल महाराज शक्तीपीठाचा महंत मी आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काम करतो. म्हणून या देवस्थानाला एक रुपयांचासुद्धा निधी दिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
स्वप्निल उमप, प्रतिनिधी, बुलढाणा : बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पोहरादेवी येथे आज मुख्यमंत्री (Chief Minister Shinde) व उपमुख्यमंत्री यांनी ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी केली. पोहरादेवीचे महंतही येथे उपस्थित होते. परंतु, महंत सुनील महाराज हे दिसले नाहीत. याबाबत बोलताना पोहरादेवीचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. परंतु, येथे पक्षपात करण्यात आला आहे. निधी वाटपाच्या धोरणात पक्षपातीपणा करण्यात आला आहे. जगदंबा देवी बावनलाल महाराज शक्तीपीठाचा महंत मी आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काम करतो. म्हणून या देवस्थानाला एक रुपयांचासुद्धा निधी दिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
या मंदिरासाठी एक रुपया दिला नाही. या मंदिराच्या दर्शनासाठी आले नाही. सगळ्या देवस्थानासाठी मुख्यमंत्र्यांनी जायला हवं होतं. पण, आमचं मंदिर ५० फुटांवर असताना ते येथे आले नाही. बंजारा समाजातील देवस्थानावर ते आले नाहीत. त्यामुळं मी समारंभाच्या ठिकाणी गेलो नाही, असंही सुनील महाराज यांनी सांगितलं.
अधिकृत निमंत्रण नव्हतं
मला निमंत्रण होतं. पण, प्रोटोकालमध्ये हे नव्हतं. निधी वाटपात भेदभाव होत असल्यामुळं मी गेलो नसल्याचं महंत सुनील महाराज म्हणाले. माझं नाव पाम्लेटमध्ये होतं तसेच पेपरमध्ये होतं. पण, मला अधिकृत कुणीही निमंत्रण दिलं नव्हतं, असंही त्यांनी म्हंटलं.
मला कुणीही फोन केला नाही. फक्त सामाजिक बॅलन्स टाकण्याकरिता माझं नाव टाकण्यात आलं. समाजाचं काम करताना सर्वांना घेऊन जावं लागते. आमच्या देवस्थानाला निधी देण्यात आला नसल्याचा आरोपही महंत सुनील महाराज यांनी केला.
घोडामैदान समोर आहे
माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातही निधी मंजूर झाला होता. पण, प्रत्येक्षात काम झाले नाही. त्यामुळं काम होते की, नाही, हे घोडामैदान समोर असल्यानं बघुया असंही सुनील महाराज म्हणाले.
संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीचं अनावरण होतं. त्यामुळं गर्दी होती. सेवालाल महाराज हे बंजारा समाजाच्या अस्मितेचा विषय होता. सेवा ध्वाजाचंही अनावरण होतं. त्यामुळं बंजारा समाजाचे लोकं आले होते.
उद्धव ठाकरे रामनवमीनिमित्त येणार
३० मार्चला रामनवमीनिमित्त संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनाकरिता उद्धव ठाकरे येणार आहेत. उद्धव ठाकरे कुठंही गेले तरी एक लाख लोकं त्यांच्या सोबत असतात. त्यामुळं गर्दी जमविण्याचं कारण नाही, असं सुनील महाराज यांनी सांगितलं.