शिंदे गटातील आमदाराने वाढदिवसाला लाडक्या सुपुत्राला तलवारीने भरवला केक, पोलीस कारवाई करणार की नाही?

सामन्या व्यक्तीवर तलवारीने केक कापल्यावर गुन्हा दाखल केला जातो. अशातच मुख्यमंत्री शिंदेंच्या गटातील एका आमदाराने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल होत आहे.

शिंदे गटातील आमदाराने वाढदिवसाला लाडक्या सुपुत्राला तलवारीने भरवला केक, पोलीस कारवाई करणार की नाही?
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 5:14 PM

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा 15 ऑगस्टला बुलढाण्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. गुरूवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला. त्यानंतर कापलेला केक तलवारीनेच पत्नी सुविध्या आणि मुलाला भरवला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल होत आहे. सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवार ने केक कापताना चां हेतू कुणाला इजा पोहचवण्याचा नाही. यावरून गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. नेत्यांना तलवार देणं म्हणजे मर्दांगीचे प्रतीक आहे. पोलीस परेड वेळी सुद्धा पोलीस तलवार दाखवतो , मग तो लोकांना धमकवतो का? ऑलिम्पिक मधील तलवार बाजीचा गेम सुद्धा बंद करणार का? असा सवाल करत संजय गायकवाड यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.

आमच्या पूर्वज कालपासून तलवार चालवतो त्यामुळे आम्ही तलवार वापरणार. चुकीचा वापर केला नसेल तर गुन्हा होऊ शकत नाही. अशाप्रकारे तलवार दाखवणे म्हणजे गुन्हा नाही. असे जर झाले तर पोलिसांवर गुन्हा दाखल होईल. सभेतील नेत्यांवरही गुन्हे दाखल होती. अशाप्रकारे गुन्हा दाखल होत असेल तर हायकोर्ट मध्ये 482 नुसार गुन्हा रद्द होऊ शकतो. शासनाने सुद्धा तंबी द्यावी की गुन्हा दाखल करू नका, असं संजय गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाडांचा वडेट्टीवारांवर निशाणा

आमचे कामाचे कौतुक संपूर्ण महारष्ट्र मध्ये होत आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कामे होतील. मात्र भ्रष्टाचार तर दूरच काँग्रेसवाल्यांना आमच्या विरोधात बोलायला शब्द नाही. रिकामे आरोप हे लोक करतायेत .आमच्या सरकार ने जर सांगितले तरी आम्ही चौकशी करू. तुमचे सरकार यायची वाट पाहू नका, ते पुढेचे दहा वर्ष येत नाही, असं म्हणत गायकवाड यांनी वडेट्टीवारांना निशाणा साधला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.