Buldhana Suicide : बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना

नांदुरा तालुक्यातील तरोडा नाथ येथील अल्पवयीन मुलीचे मोताळा तालुक्यातील गोशिंग येथील राहणारा शेख अल्ताफ शेख शकील या 21 वर्षीय युवकाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते. सोमवारी 21 मार्च रोजी दोघेही सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घरून निघून गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी परतले नसल्याने घरच्या लोकांनी सर्वत्र शोध घेतला.

Buldhana Suicide : बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना
बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 7:06 PM

बुलढाणा : अज्ञात कारणावरुन एका प्रेमीयुगुला (Couple)ने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील गोशिंग शिवारात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रेमीयुगुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Couple commits suicide by jumping into a well in Buldhana)

कालपासून दोघेही बेपत्ता होते

नांदुरा तालुक्यातील तरोडा नाथ येथील अल्पवयीन मुलीचे मोताळा तालुक्यातील गोशिंग येथील राहणारा शेख अल्ताफ शेख शकील या 21 वर्षीय युवकाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते. सोमवारी 21 मार्च रोजी दोघेही सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घरून निघून गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी परतले नसल्याने घरच्या लोकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र दोघे कुठेही सापडले नाहीत. या प्रकरणी दोन्ही परिवारांकडून पोलिसांत हरवल्याची तक्रारही देण्यात आली होती. मात्र मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह गोशिंग शिवारात एका शेतातील विहिरीत आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गोंदियात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अज्ञात कारणावरुन 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे घडली आहे. भुपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तरुणाचे आई व बहिण बाहेरगावी गेले होते आणि वडील हे गायी म्हशी चारण्याकरीता जंगल परिसरात गेले होते. त्यामुळे घरी कुणीच नव्हते. हीच संधी साधत भूपेंद्रने गळफास लावून घेतला. भूपेंद्रने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत्यूदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवला. (Couple commits suicide by jumping into a well in Buldhana)

इतर बातम्या

Ambernath Lift Collapse : अंबरनाथमध्ये दुसऱ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळून सात महिला जखमी, दोघींचे पाय मोडले

Chandrapur | कोळसा वसाहतीत गटार लाईनची स्वच्छता, 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.