चित्राताई या विचित्र ताई, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका
असं कसं लोकशाहीमध्ये होत आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
बुलढाणा : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या काल पत्रकारावर भडकल्या. यावर विचारलं असता माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, चित्राताई या विचित्र ताई आहेत, हे सर्वांनाचं माहीत आहे. अरेरावी किती प्रमाणात करावी. ही लोकशीही की, हिटलरशाही आहे. वारंट निघालं, धमकी दिली तरी त्यांच्यावर सुरक्षा दिली जात आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला विरोध करावासा वाटतो. कारण इतिहास मोडतोड करण्यात येत आहे. याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला. त्यांना अटक करण्यात आली. ही संविधानाला मान खाली करावं लागणारी आहे. असं कसं लोकशाहीमध्ये होत आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
दुसरीकडं, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार घातला. वर्ध्यातील विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद आयोजित होती. यावेळी तीन ते चार पत्रकार उपस्थित असल्याची माहिती आहे. यवतमाळात पत्रकार परिषदेत प्रश्न विचारताच भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ संतप्त झाल्या.
चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावरून पत्रकार संघटना आक्रमक झाल्या. जिल्ह्यातील जवळपास सर्वच पत्रकार संघटनानी पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे व राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाणबुडे यांनी म्हंटलं.