“जे ईव्हीएम वर शंका घेत होते त्या शंका घेणे आता बंद”; शिवसेनेच्या खासदाराने विरोधकांवर तोफ डागली

माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अंधश्रध्देच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या निकालादिवशी ते होम हवन करत होते असा टोला त्यांनी खैरे यांना लगावला आहे.

जे ईव्हीएम वर शंका घेत होते त्या शंका घेणे आता बंद; शिवसेनेच्या खासदाराने विरोधकांवर तोफ डागली
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 9:36 PM

बुलढाणा : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या विजयाची मोहोर उमटविल्यानंतर आता भाजपवर विरधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तर भाजपने आपला पराभव मान्य करत मतदारांनी जो कौल दिला आहे, त्याचा आम्ही स्वीकार करतो असं मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडून मात्र विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात आता हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेसच्या सत्तेच्या लालसेपोटी आपली तत्वं बाजूला ठेऊन सर्व विरोधक एकजूट होत आहेत मात्र त्याचा काहीच परिणाम होणार नाही असा विश्वासही प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

नितिश कुमार, उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावरून आता राजकीय चर्चेना उधान आले आहे. त्यावरूनच आता खासदार प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, भाजपचा विजय झाल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षांकडून ईव्हीएमवर शंका घेत होते.

ते मात्र आता कर्नाटकातील विजयानंतर त्यांनी आता शंका घेणे आता बंद केले असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेसने बाजी मारली असली तरी या निकालाचा राज्यात काही परिणाम होणार नाही असा विश्वासही त्यांनिी यावेळी व्यक्त केला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाला नेमकी कोणती कारणे आहे, मात्र हा जनतेचा कौल आहे आणि तो आम्ही मान्य केला पाहिजे असंही प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला असला तरी त्याचा ठाकरे गटाला काहीही फायदा होणार नाही.

त्या गटाला काहीही मिळालं नाही, आणि मिळणार नाही असा टोलाही प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

दुसऱ्याच्या घरात मुलगा झाल्यानंतर साखर पान वाटण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तर माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अंधश्रध्देच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या निकालादिवशी ते होम हवन करत होते असा टोला त्यांनी खैरे यांना लगावला आहे.

तर त्याच वेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना हा लबाड माणूस असल्याची टीका त्यांनी केली आहे. कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसतात, त्यामुळे तीन महिन्यात सरकार पडणार या संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर खासदार जाधव यांनी टीका केली आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.