कोबी पिकवायला खर्च आला 60 हजार, त्यातून 60 रुपयेही निघाले नाहीत”; शेतकऱ्याने सरळ…
एकीकडे सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तर दुसरीरकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी शेतकऱ्यांची आर्थिक कसरत चालू आहे. शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.
बुलढाणाः शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकासाठी केलेला खर्चही शेतीमालातून येत नसल्याने आता शेतकऱ्यांनी पीकच मातीत घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतात पिकवलेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कुणी पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे तर कुणी उभा पिकात जनावरं सोडून देण्यात आली आहे. याबद्दल शेतकऱ्यांना विचारला असता आलेल्या पिकातून साधा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीं येथील शेतकरी मधुकर शिंगणे यांनी दोन एकर शेतामध्ये लावलेल्या कोबी पिकाला बाजारात योग्य भाव मिळालेा नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
शेतामध्ये लावलेल्या पिकाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कोबी शेतात मेंढ्या चरायला सोडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या या हंगामामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे.
तरीही शासनाचा एकही प्रतिनिधि पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्याकडे आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता भाजीपाला शेती करायची की नाही, असा सवाल आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
देऊळगाव मही परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतात मात्र बाजारात पिकांना भाव मिळत नाही. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कोबी पडून असल्याने आता खराब झाली आहे. तर काहींनी शेतात रोटरसुद्धा फिरवला आहे.
शेती पिकामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. एकीकडे सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमाला मातीमोल किंमतीने शेतीमाल खरेदी केला जात आहे.