Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बाईकवरुन युटर्न घेत होते, भरधाव एसटी दिसलीच नाही, जे घडलं, ते भयाण होतं!

हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ (Cctv) पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. बस आणि बाईकस्वाराचा (Bike Accident) हा अपघात आहे. एका भरधाव एसटीने एका बाईकस्वाराला उडवले आहे.

Video | बाईकवरुन युटर्न घेत होते, भरधाव एसटी दिसलीच नाही, जे घडलं, ते भयाण होतं!
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 11:32 AM

बुलडाणा : बुलडाण्यातला एक असा अपघाताचा व्हिडिओ (Accident) समोर आला आहे. जो पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ (Cctv) पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. बस आणि बाईकस्वाराचा (Bike Accident) हा अपघात आहे. एका भरधाव एसटीने एका बाईकस्वाराला उडवले आहे. या अपघाताचा पूर्ण थरार एका सीसीटीव्ही व्हिडिओत कैद झाला आहे. नागपूर -औरंगाबाद हायवेवर घडलेला हा अपघात आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. महारामार्गावरील निष्काळजीपण किती महागात पडू शकतो, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. पहिल्यांदा एका वळणावर या बाईकस्वाराने दुसऱ्या बाजूने येऊन बाईक थांबवली आहे. बाईकस्वाराने टर्न मारताना पाठिमागून वाहन येतंय की नाही याची खातरजमा न करताच टर्न मारला. त्यानंतर थेट त्याला दुसऱ्या बाजून येणाऱ्या भरधाव एसटीने जोरदार धडक दिल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

मोटारसायकल चालकाचा हलगर्जीपणा नडला

बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर – औरंगाबाद हायवे असलेल्या अंढेरा फाटा येथे मोटारसायकल आणि एसटी बसचा हा अपघात झालाय. हा अपघात एवढा भयानक होता की बसने जोराची धडक दिल्यानंतर बाईकही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली आहे. यावरून या अपघाताची दाहकता लक्षात येते.

अंढेरा फाट्यावर मोटारसायकल ही दुसऱ्या बाजूने वळण घेत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने या मोटारसायकलला उडवले आहे. याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमीला तात्काळ रुग्णलयात उपचार साठी हलविले.

पाहा व्हिडीओ – ही दृष्य तुम्हाला विचलीत करु शकतात!

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात एकाचा जागीत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुसरा व्यक्ती जो या अपघातात जखमी झाला आहे. त्यांच्याबाबत अधिकृत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाहीये. मात्र या अपघातात दुसरी व्यक्तीही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात पोलीस किंवा रुग्णालय प्रशासनाचीही अधिकृत बाजू आणखी समोर आलेली नाहीय. मात्र या भयानक अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा अपघातचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होतं आहे. महामार्गावरील एक चूक जीवावर बेतू शकते, त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

दादरच्या डायमंड ज्वेलरीतील चोरी क्राईम पेट्रोल पाहून; चोरट्यानं सीसीटीव्हीचा ड्राईव्हही पळविला होता

Video | अरे यार, हिनं तर खऱ्या अर्थानं ‘बाईट’ दिला! मुंबई पोलिसांच्या हाताला चावणारी ती कोण?

आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत 21 वर्षीय तरुणाची हत्या, वर्गमित्राला अटक

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.