पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?

गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 7:43 PM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झालीय. नदीला पूर आल्याने अनेकांचे नुकसान झाले. जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील बेंबाळेश्वर नदीला आलेल्या पुराने सुद्धा अक्षरशः थैमान घातले होते. नदीतील पुराचे पाणी जामोद येथील शेतकरी तेजराव लोणे यांच्या धान्य गोडाऊनमध्ये शिरले. त्यामुळे अक्षरशः गोडाऊनसुद्धा अर्ध्यावर बुडाले होते. गोडाऊन मध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

धान्याची विक्री करून बांधायचे होते घर

लाखो रुपयांचे नुकसान या पुराच्या पाण्यामुळे तेजराव लोणे या शेतकऱ्याचे झाले. मागील वर्षांपासून शेतीतील हा शेतमाल दर वाढेल, या आशेने गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता. यावर्षी त्याची विक्री करून त्यांना घर बांधायचे होते. तर यातील काही माल हा विकतसुद्धा घेऊन ठेवलेला होता. मात्र पुराने आता त्याचा स्वप्न भंगले आहे. यामध्ये सोयाबीन, गहू, हरभरा, तुर , मका यासह इतरही धान्य भिजले. नुकसान झाल्याने आता घर कसे बांधायचे असा प्रश्न शेतकरी तेजराव लोणे यांच्यासमोर आहे.

गोदामात शिरले पाच फूट पाणी

जामोद गावाबाहेरून बेंबाळेश्वर नदीला पूर आला. पुरामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेजराव लोणे या शेतकऱ्यानी घरी गोदामाम धान्य ठेवले होते. या गोदामात पाच फूट पुराचे पाणी शिरले होते. ज्वारी, हरभरा, तूर असे धान्य दोन वर्षांपासून साठवूण ठेवले होते.

अडीचशे क्विंटल माल काळवंडला

बेंबाळेश्वर नदीतील पाणी गोदामात शिरले आणि धान्याला अंकूर फुटले. गोदामात गहू, हरभरा, तूर, मका हे सर्व पाण्याखाली होते. घरचे सगळे लोकं येऊन तिथून माल काढला. तोपर्यंत बराच माल भिजला होता. आता त्या धान्याला अंकूर आले आहेत. हे धान्य विकून आम्ही घर बांधणार होतो. पण, धान्य भिजल्याने आता आमचं घराचं स्वप्न हवेत विरल्याचं पूरपीडित शेतकऱ्याने सांगितले. सुमारे अडीचशे क्विंटल माल होता. तो काळवंडल्याने आता कुणीही खरेदी करणार नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.