Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Buldana : बुलडाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी, दोन गटात वाद, आमदार श्वेता महालेंच्या भाजपच्या युवा मोर्चातर्फे आयोजन

दहीहंडी फोडण्यासाठी आपला नंबर आधी आहे. या कारणावरून हा वाद झाला. पुन्हा वाद उफाळून आला. एका गोविंदाला अतोनात मारहाण करण्यात आली. त्याचा जीव जाईल, अशी भीती लोकांना वाटत होती.

Video Buldana : बुलडाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी, दोन गटात वाद, आमदार श्वेता महालेंच्या भाजपच्या युवा मोर्चातर्फे आयोजन
बुलडाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 5:23 PM

बुलडाणा : चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले व भाजपा युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात झालेल्या मारहाणीत (Hanamari) गोविंदा जखमी झालाय्. दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदानी डॉल्बीवर धुंदीत नाचताना जमावाने एकास बेदम मारले. दहीहंडी मंडळात सुरुवातीला वाद झाला. तीन मिनिटे त्या युवकाला बेदम मारहाण होत होती. पोलिसांना एव्हढ्या मोठ्या गर्दीमध्ये घुसता येत नवते. त्यामुळं युवकाला बेदम मारहाण झाली. नंतर तो वाद निवळला. शेवटी घाई घाईत दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रम संपविण्यात आला. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी दहीहंडीचा (Dahihandi) कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दोन पथकात जोरदार हाणामारी झाली. यावेळी अनेक गोविंदा जखमी झाले. शुक्रवारी रात्री डॉल्बीच्या (Dolby) तालावर नाचगाणे सुरू होते. दहीहंडी आधी कुणी फोडायची यावरून वाद झाला. पोलिसांचा बंदोबस्त अपुरा पडला.

चांगल्या कार्यक्रमाला लागले गालबोट

दहीहंडी फोडण्यासाठी आपला नंबर आधी आहे. या कारणावरून हा वाद झाला. पुन्हा वाद उफाळून आला. एका गोविंदाला अतोनात मारहाण करण्यात आली. त्याचा जीव जाईल, अशी भीती लोकांना वाटत होती. सुमारे एक तास ही हाणामारी सुरू होती. शेवटपर्यंत दहीहंडी न फुटता कार्यक्रम संपला. शुक्रवारी मुंबई, पुण्यासह इतरत्र दहीहंडीचा कार्यक्रम झाला. दोन वर्षानंतर हा कार्यक्रम झाला. त्यामुळं उत्साह होता. पण, या उत्साहाच्या भरात चिखलीत ही हाणामारीची घटना घडली. त्यामुळं दहीहंडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले.

व्हिडीओत नेमकं काय

या व्हिडीओत दहीहंडीच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी दिसत आहे. या गर्दीत काही लोक एका युवकाला मारहाण करत आहेत. ज्या ज्या कडावर पडेल, त्या त्या कडावर त्याला मारहाण केली जात आहे. पाहणारे बिचारा मरेल, अशी भीती व्यक्त करत आहेत. या गर्दीत कुठंही पोलीस दिसत नाहीत. त्यामुळं ही मारहाण झाली. योग्य पद्धतीनं बंदोबस्त असता तर कदाचित एवढी मोठ्या प्रमाणात मारहाण झाली नसती.

हे सुद्धा वाचा

चार वर्षांपूर्वीही दहीहंडीत धक्काबुक्की

चिखलीत 3 सप्टेंबर 2018 दहीहंडी होती. त्यावेळी मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेना धक्का-बुक्की करण्यात आली होती. नेहानं रागावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आयोजकांनी माफी मागूनही पेंडसे नाराज झाल्या होत्या. त्यावेळी आमदार श्वेता महाले या जिल्हा परिषद सदस्य होत्या. सेल्फी काढण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यानं हा प्रकार घडला होता. त्यावेळी वैतागलेल्या नेहानं धक्काबुक्कीनंतर लगेच काढता पाय घेतला होता.

'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.