Buldana, Fire | खामगावात अॅग्रो इंडस्ट्रीजला मोठी आग, कपासीसह बारदाना जळाला, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
घटनेची माहिती खामगाव नगरपालिकाच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनस्थळी पोहचून आगीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण गठानी आणि बारदाना जळून खाक झाल्या होत्या.
बुलडाणा : खामगाव शहराबाहेरील नांदुरा रोडवर असलेल्या तुलसी कृपा ऍग्रोटेक कंपनीमध्ये अचानक भीषण आग लागलीय. या आगीमध्ये कपाशीच्या गठानी आणि बारदाना संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेमध्ये कंपनीची कोट्यावधी रुपयांची हानी (Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील तुलसी कृपा (Tulsi Kripa) ऍग्रोटेक कंपनीच्या गोडाउनमध्ये (Warehouse) कपाशीपासून तयार करण्यात आलेल्या रुईच्या गठाणी आणि बारदाना ठेवण्यात आलेला होता. या गोडाऊनला अचानकपणे भीषण आग लागली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागली की, लावण्यात आली
घटनेची माहिती खामगाव नगरपालिकाच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनस्थळी पोहचून आगीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण गठानी आणि बारदाना जळून खाक झाल्या होत्या. ज्या ठिकाणी या रुईच्या गठाणी ठेवण्यात आल्या होत्या. त्या गोडाउनमध्ये विद्युत पुरवठा ही नसताना आणि चारी बाजूने सिमेंटच्या भिंती असताना आग लागली की लावण्यात आली. याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहे. कापूस असल्यानं आग भराभर पसरली. आगीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न झाले. पण, आग पाहिजे त्या प्रमाणात आटोक्यात आली नाही. त्यामुळं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय.
सिलिंडरचा स्फोट होऊन दोन घरांना आग
भंडाऱ्यात सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना भंडारा शहरातील अशोक हॉटेलच्या मागे घडली आहे. यात दोन घरांतील अन्न-धान्याची राख रांगोळी झाली आहे. लागलीच याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर 4 तासाच्या अथक प्रयत्न प्रयत्नानंतर दोन्ही घरांवरील आगीवर नियंत्रण मिळविले. यात दोन्ही घर मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता नुकसानभरपाईची मागणी होत आहे.