Buldana Market | महागाई आणि चारा टंचाईमुळे जनावरे विक्रीस, खामगाव बाजारात कवडीमोल भाव
यंदा परिसरातील शेतकऱ्यांना दुबार हंगाम घेता न आल्यामुळे चाराटंचाई निर्माण झालीय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात चाऱ्याची आवक वाढली आहे. मात्र चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे.
बुलडाणा : गेल्या चार, पाच वर्षांपासून सतत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सातत्याने जाणावणारी पाणीटंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहचणे आदी कारणांमुळे जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालीय. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता दिवसेंदिवस कमी होत आहे. महागाई आणि चारा टंचाईमुळे काळजावर दगड ठेवून जीवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ आता बुलडाणा जिल्ह्यात पशुपालकांवर आलीय. त्यामुळे खामगाव (Khamgaon) येथील टीएमसी मार्केट यार्डमध्ये गुरांच्या बाजारात (Cattle Market) परिसरातील पशुधन मोठ्या प्रमाणात कवडीमोल भागात विक्री केल्या जात आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गाई-म्हशी पाळल्या आहेत. दुष्काळावर मात करीत अनेकांनी पशुपालन (Animal Husbandry) तसेच दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. मात्र सतत चारा, आणि जनावरांच्या खाद्यामध्ये होणारी दरवाढमुळे शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळणे अवघड झालेय.
दुग्ध व्यवसायावर संकट
हिरव्या चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसायावर झाला आहे. दुग्ध व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो. परंतु आता हा व्यवसायही धोक्यात आलाय. माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जीवांचीही होरपळ वाढलीय. पाणी चाऱ्याअभावी पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिलंय. यंदा परिसरातील शेतकऱ्यांना दुबार हंगाम घेता न आल्यामुळे चाराटंचाई निर्माण झालीय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात चाऱ्याची आवक वाढली आहे. मात्र चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे.
चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
जीवापाड जपलेली गाई, गुरे, बैल, म्हशी चारा- पाण्याअभावी विक्रीस काढण्याची नामुष्की आता पशुपालकांवर आलीय. संकटग्रस्त पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करून द्याव्या, अशी मागणी शेतकरी करीत आहे. चारा छावण्या सुरू केल्यास पशूंना चारा मिळेल. त्यामुळं चारा छावण्या सुरू करणे आवश्यक आहे.