शेगावला येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, पर्यटन विकासाला मिळणार चालना
काही वर्षांपासून काही कारणामुळे शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेगावची भविकांची गर्दी कमी झाली होती.
बुलढाणा : राज्यातील मोठं देवस्थान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांचे आहे. गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकारकडून जमीन मिळाली. त्यावर धार्मिक, अध्यात्मिक तसेच पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन स्थळाची उभारणी करण्यात आली. याठिकाणी सुमारे दोनशे एकरवर जमीन आहे. आनंद सागरमुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक तसेच पर्यटन वाढलं होतं. पण काही वर्षांपासून काही कारणामुळे शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेगावची भविकांची गर्दी कमी झाली होती.
आनंद सागरच्या रंगरंगोटीचे काम सुरू
आता आनंद सागर हे येत्या दोन महिन्यांत भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या याठिकाणी बंद असलेल्या आनंद सागरला दुरुस्त करून आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.
भक्तांसाठी आनंदाची बातमी
राज्यभरातील गजानन महाराज भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शेगावचे पर्यटन स्थळ असलेलं आनंद सागर हे येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहे. सध्या आनंद सागरचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. गजानन महाराज यांच्या भविकांसाठी आणि पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
आनंद सागर सुरू करण्याची मागणी
आनंद सागर पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली जात होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल केले जात होते. त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे.
तलाव, ध्यानकेंद्र विशेष आकर्षण
आनंदसागर येथे उद्यान आणि ध्यान केंद्र आहे. सुमारे दोनशी एकर जागेवर हे विकसित करण्यात आले आहे. मुलांना खेळण्यासाठी सुविधा आहेत. तलाव, ध्यानकेंद्र हे आनंद सागरचे वैशिष्ट आहेत.