जिजाऊ वंदना, शिवबाचा पाळणा म्हणत शिवजयंती; इतक्या नद्यांच्या पाण्याने मूर्तीला जलाभिषेक

सकाळी जिजाऊ वंदना आणि बाल शिवबाला पाळण्यामध्ये टाकून पाळणा म्हणत शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली. पाच नद्यांमधून आणलेल्या जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला.

जिजाऊ वंदना, शिवबाचा पाळणा म्हणत शिवजयंती; इतक्या नद्यांच्या पाण्याने मूर्तीला जलाभिषेक
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 11:22 AM

बुलढाणा : बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जिजामाता प्रेक्षागार याठिकाणी सकाळी जिजाऊ वंदना आणि बाल शिवबाला पाळण्यामध्ये टाकून पाळणा म्हणत शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली. पाच नद्यांमधून आणलेल्या जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर मावळ्यांच्या वेशभूषेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवजयंती कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील तमाम शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी उपस्थित होते.

आकर्षक विद्युत रोषणाई

बुलढाणा जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह आहे. मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी केला जातेय. जिल्ह्यातील खामगाव शहरातील शिवाजी स्टेडियम येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा तसेच मा जिजाऊंच्या प्रतिमेला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

फटाक्यांची आतषबाजी

रात्री बारा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत बारा वाजल्यापासून बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवाजी स्टेडियमवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई लावण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईच्या लखलखाटाने खामगाव नगरी उजळून गेली आहे.

दोन तास पोवाड्यांचे गायन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने बुलढाणा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सुप्रसिद्ध शाहीर देवानंद माळी यांच्या छत्रपती शिवरायांचे स्वराज्य पोवाडे कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी देवानंद माळी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर, शौर्य गाथेवर आणि लोकशाही स्वराज्याच्या संकल्पनेवर आपल्या खास शैलीत सतत दोन तास पोवाड्यांचे गायन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेय. शिवजयंतीचा उत्साह वाढविला.

मशाल हाती घेऊन शहराची प्रदक्षिणा

वाशीम शहरातील शिवप्रेमी युवती वैष्णवी यादव हिने हाती शिव मशाल घेऊन वाशिम शहराची नगर प्रदक्षिणा पूर्ण करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. गत ५ वर्षांपासून वैष्णवी शिवजयंतीला हा उपक्रम राबवत आहे. त्यामागे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील स्त्री पुरुष समानता आणि महिलांप्रती असणारी सन्माची भूमिका आहे, असे ती सांगते. सकाळी ५ ला वाशिम शहरातील परळकर चौकातून मशाल नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली. अहिल्याबाई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक मार्गे शिव मशाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शिव वंदना गायन करून स्थापित करण्यात आली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.