Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : भावाच्या मदतीसाठी आलेल्या युवकाचे अपहरण करुन मारहाण, चौघांना अटक

थर्टीफस्टच्या रात्री आबिद शाह हा तरुण आपल्या बाईकवरुन शहराकडून मिल्लत नगरकडे चालला होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या पल्सर बाईकने आबिद शाह याच्या बाईकला जबरदस्त धडक दिली. त्यानंतर सदर पल्सर बाईकही रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकला जाऊन आदळली.

Buldhana : भावाच्या मदतीसाठी आलेल्या युवकाचे अपहरण करुन मारहाण, चौघांना अटक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:55 PM

बुलढाणा : अपघातग्रस्त भावाच्या मदतीला आलेल्या युवकाचे अपहरण करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी अपहृत तरुणाची सुटका केली असून याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. चारही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज, राहुल, जतिन, शुभम अशी आरोपींची नावे असून चौघेही शेगावमधील रहिवासी आहेत.

थर्टीफस्टच्या रात्री आबिद शाह हा तरुण आपल्या बाईकवरुन शहराकडून मिल्लत नगरकडे चालला होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या पल्सर बाईकने आबिद शाह याच्या बाईकला जबरदस्त धडक दिली. त्यानंतर सदर पल्सर बाईकही रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकला जाऊन आदळली. विशेष म्हणजे पल्सर बाईकवर नंबर प्लेट नव्हती. या धडकेत आबिद शाह जखमी झाला. तर पल्सर बाईकवर सवार दोन्ही तरुणही जखमी झाले.

अपघातग्रस्त भावाच्या मदतीला आला असता तरुणाला मारहाण करीत अपहरण

आबिद शाहने आपला लहान भाऊ रिजवान शाह याला फोन करुन आपल्या मदतीसाठी घटनास्थळी बोलावले. तर पल्सर बाईकवरील तरुणांनीही आपल्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. दरम्यान आबिदचा भाऊ रिजवान घटनास्थळी दाखल झाला आणि तो भावाची रस्त्यावर पडलेली बाईक उचलत असतानाच पल्सरवरील तरुणांच्या मदतीसाठी आलेल्या तरुणांनी रिजवानला मारहाण सुरु केली. त्यानंतर त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञात स्थळी नेत तेथेही मारहाण केली.

पोलिसांनी कसून शोध घेत तरुणाला शोधले

घटनेची माहिती मिळताच रिजवानच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध सुरु केला. मात्र तो कुठेही सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी शेगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्याबाहेर लोकांची गर्दी जमली. पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून रिजवान कसून शोध सुरु केला. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावला. अखेर शेगाव पोलिसांनी कसून शोध घेत रिजवानला शोधून काढले.

चार आरोपींना अटक, विविध कलमान्वये गुन्हे दाखल

याप्रकरणी पोलिसांनी चार युवकांना अटक केली आहे. चारही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये राज, राहुल, जतिन, शुभम सर्व राहणार शेगाव यांचा समावेश आहे. दरम्यान आरोपींनी हे कृत्य का केले याबाबत पोलीस आरोपींची चौकशी करीत आहेत. (Kidnapping and beating of a youth who came to help his brother in buldhana)

इतर बातम्या

Nanded: व्हॉट्सअपवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकली, मग विष प्राशन करुन आत्महत्या, या कारणामुळे प्रेमी जोडप्याने उचलले टोकाचे पाऊल

Ahmednagar Crime: भरदिवसा तरूणाच्या निर्घृण हत्येने कोपरगाव हादरलं, आरोपींचा शोध सुरु

.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले.
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा.
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.