मोठी बातमी! माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडे यांना थेट जीवे मारण्याची धमकी

माजी राज्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित माजी राज्यमंत्र्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून भिडेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

मोठी बातमी! माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडे यांना थेट जीवे मारण्याची धमकी
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 8:19 PM

बुलढाणा | 2 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सडकून टीका केली जात आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद पडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्याचं सर्वोच्च सभागृह मानलं जाणाऱ्या विधानसभेतही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन वातावरण तापल्याचं बघायला मिळालं. तसेच राज्यभरात संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. तर सोलापुरात संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी आज दुग्धाभिषेक आंदोलन पुकारलं होतं. पण भिडे यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आता संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. “भिडे गुरुजींना अटक करा. अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी धमकी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिली आहे. सुबोध सावजी यांनी गृहमंत्र्यांना निवेदन देऊन भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली.

सुबोध सावजी नेमकं काय म्हणाले?

संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, अन्यथा त्यांचा मी मर्डर करेन, अशी धमकी बुलढाणा येथील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिलीय. तसे एक निवेदन सुद्धा सावजी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे. जर आपण भिडेंवर कारवाई केली नाही तर याची जबाबदारी आपली राहील, असा इशारा सावजी यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.

“संभाजी भिडे हे सापडलेले बेवारस अर्भक आहेत. त्यांनी महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी”, अशी मागणी सुबोध सावजी यांनी केलीय.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाईचं आश्वासन

दरम्यान, विधानसभेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील संभाजी भिडे यांच्यावर आज कारवाईची मागणी केली. संभाजी भिडे हे असतील तिथून त्यांना उचलून जेलमध्ये टाका, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन आज सभागृहात दिलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.