TOURIST : लोणार सरोवर स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची हेळसांड

बेसॉल्ट खडका मधील उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आहे.

TOURIST : लोणार सरोवर स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची हेळसांड
lonar sarovarImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 11:09 AM

बुलढाणा : संपूर्ण जगात नावलौकिक असलेल्या लोणार सरोवर स्थळी पर्यटन प्रेमींना पिण्याचे स्वच्छ पाणी, सुलभ शौचालय अशा मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने देश विदेशातून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटक (TOURIST) प्रेमींची हेळसांड होत आहे. त्यामुळे स्थानिक नगर पालिका प्रशासन (Local Municipal Administration) आणि पर्यटन विभागाने (Department of Tourism) मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. पर्यटन स्थळी मुलभूत गरजा नसल्यामुळे तिथं जाण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करीत आहेत. त्याचबरोबर तिथं पर्यटनासाठी जात असलेले पर्यटक सुविधा उपलब्ध कराव्या अशी मागणी करीत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून मागणी करुनही तिथं कसल्याही प्रकारची हालचाल होत नसल्याचे माहिती मिळाली आहे.

महिलांची अधिक कुंचबना होत आहे

बेसॉल्ट खडका मधील उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आहे. त्याच परिसरात, विरज धारातीर्थ, पापाहरेश्वर, सीतान्हानी, दैत्य सुदन मंदिर, मोठा मारुती मंदिर असे एक नाही, तर अनेक प्राचीन धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेल स्थळ आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राज्य तसेच देश-विदेशातील पर्यटक, दररोज शेकडोच्या संख्येने लोणार शहरात येत असतात. परंतु पर्यटन स्थळी स्वच्छ पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय नसल्याने, विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. याकडे स्थानिक पालिका प्रशासन तसेच पर्यटन विभागाचे वेळीच लक्ष वेधून सरोवर परसरतील सर्व प्रेक्षणीय स्थळावर पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सचिन कापुरे, यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आणि पर्यटकांनी अनेक गोष्टी तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या कानावर घातल्या आहेत. परंतु कसल्याची प्रकारची प्रगती अद्याप झालेली नाही. विशेष म्हणजे तिथं विदेशी पर्यटक सुध्दा येतात, त्यांनी सुध्दा तक्रारी केल्या आहेत.

रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....