“आता त्यांचे थोबाड फोडण्याची वेळ आली”;शिंदे गटाच्या नेत्याची राऊतांवर सडकून टीका
शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष या दोन्ही गोष्टी शिंदे गटाला मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. न्यायालयही सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याची टीका त्यांनी केली होती
बुलढाणाः खासदार संजय राऊत यांच्याकडून सध्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आज संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत असताना त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यामुळे भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे आता शिंदे गटातील नेत्यांनी संजय राऊत यांना थेट थोबाडण्याची भाषा केली आहे.
संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना त्यांनी आता त्यांचे थोबाड फोडण्याची वेळ आली आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय गायकवाड यांनी येणाऱ्या काळात माझ्याकडून त्यांना कसा धडा मिळणार आहे हे त्यांना येत्या काही दिवसातच समजेल अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष या दोन्ही गोष्टी शिंदे गटाला मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. न्यायालयही सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याची टीका त्यांनी केली होती,
तर न्यायालयाने निर्णय देऊनही संजय राऊत यांनी 2 हजार कोटींचा सौदा होऊन हा निर्णय झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी शिंदे गटावर केला होता. त्यावर बोलताना संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना आता शॉक देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
तर ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांना पायउतार केले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच कार्यकर्त्यांना आपले चिन्ह जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांना कायदेशीर अक्कल असती तर त्यानी अशी टीका केली नसती अशा शब्दात संजय गायकवाड यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.