बुलडाणा : आमदार संजय कुटे (Sanjay Kute) म्हणाले, शेगाव (Shegaon) शहरात पोलिसांकडून काही घटना घडल्या. त्यात भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यात कलम 353 ही कलम हमखास लावली जाते. पोलीसच शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे. असा आरोप करत अशा गुन्ह्याची तपासणी वरिष्ठ अधिकारी (Senior officer) यांनी करावी. तसेच सदर कलम मागे घ्यावे, अशी मागणी आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेगावात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलीय. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी शेगाव शहरात धरणे आंदोलन करण्यात येईल. सोमवारी जिल्हाभर तहसील कार्यलयाला निवेदने देण्यात येणार असल्याची घोषणा ही यावेळी करण्यात आलीय.
शेगाव शहरात श्रीराम नवमी निमित्ताने काही दिवसांपासून खामगाव रोडवरील मार्केट यार्ड तसेच हॉटेल एमटीडीसी येथे आनंद मेला सुरू आहे. यामध्ये 13 एप्रिल रोजी रात्री याठिकाणी रामाचे गाणे लावं असे समोर म्हणून मेला चालकास आणि त्याचे पत्नीला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले. दोन्हीकडील व्यक्ती तक्रार देण्यास तयार नसताना तसेच प्रकरण आपसात सामंजस्याने मिटवण्यास तयार असताना शहर पोलिसांनी हेतुपुरस्सर स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई केली, असा आरोपही संजय कुटे यांनी केलाय.
काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयावर विश्वास नसल्याचे टीका केली होती. मात्र भाजप आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी याच विधानाची एकप्रकारचे पुष्टी केल्याचे दिसतंय. कारण शेगावमध्ये स्थानिक एका मुद्द्यावर कुटे यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांना मोठ्मध्ये नेत्यांना पोलीस आणि कोर्टाकडून दिलासा मिलतोय. मग सर्वसामान्य लोकांना का मिळत नाही. त्यावर कुटे म्हणाले की पोलीस प्रशासन, न्याय प्रशासन आमच्या विराधात कितीही वापरल्या तरी आम्ही प्रोटेस्ट करू. वेळप्रसंगी कोर्टात जाऊ, कोर्ट आमच्यासाठी सर्वकाही आहे. कोर्टात आम्हाला न्याय मिळतोय. कोर्टात या विषयाचे काय करायचे ते आम्ही करू. कारण कोर्टात बऱ्याच गोष्टी करता येतात आणि कोर्टात आम्हाला माहिती आहे काय होते. ते आम्ही करू, असे विधान कुटे यांनी केलंय. त्यामुळे कुटे याना नेमके काय म्हणायचे आहे?