Buldhana Beating : चिखलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील मनसे शहर सचिव अजय खरपास याने त्‍याच्‍या फेसबुक खात्यावर 20 फेब्रुवारीला महिलांबद्दल शिवजयंतीशी संबंधित आक्षेपार्ह पोस्‍ट टाकली होती. ही पोस्ट टाकताच त्‍याला अनेकांचे फोनही सुरू झाले होते. यावेळी त्याने ती पोस्ट डिलिटही केली होती.

Buldhana Beating : चिखलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल
चिखलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 8:10 PM

बुलढाणा : महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्‍ट (Offensive post) फेसबुकवर टाकणाऱ्या मनसैनिकाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेसबॉलच्या स्टील रॉडने जबर मारहाण (Beating) केल्याची घटना 20 फेब्रुवारीला रात्री घडली आहे. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर जखमी मनसे कार्यकर्त्यांवर औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजय खरपास असे जखमी मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. चिखली पोलिसांत याप्रकरणी 7 आरोपींविरुद्ध कलम 307, 143, 147, 148, 149, 144, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. (MNS worker beaten by BJP workers in Chikhali, Incident captured on CCTV)

महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मारहाण

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील मनसे शहर सचिव अजय खरपास याने त्‍याच्‍या फेसबुक खात्यावर 20 फेब्रुवारीला महिलांबद्दल शिवजयंतीशी संबंधित आक्षेपार्ह पोस्‍ट टाकली होती. ही पोस्ट टाकताच त्‍याला अनेकांचे फोनही सुरू झाले होते. यावेळी त्याने ती पोस्ट डिलिटही केली होती. मात्र अजयच्या तक्रारीनुसार, त्याच रात्री आरोपी शिवराज पाटील यांचा त्‍याला फोन आला आणि मला तुझ्याशी तू फेसबुकवर टाकलेल्या पोस्टबद्दल बोलायचे आहे. तू पानगोळे हॉस्पिटलसमोर ये, असे सांगितले. त्‍यामुळे अजय एकटाच पानगोळे हॉस्पिटलसमोर गेला असता, तिथे शिवराज पाटील, गोविंद देव्हडे, मुकेश पडघान आले आणि त्यांनी अजयला गाडीतून बेसबॉल खेळण्याची स्टीलची बॅट आणून जबर मारहाण केली. त्याच्या दोन्ही पायांवर मारल्याने अजय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या औरंगाबादच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींमध्ये भाजपच्या शिवराज पाटील, मुकेश पडघान, गोविंद देव्हढे, संजय अतार, अंकुश तायडे, सागर पुरोहित, संदीप पाटील यांचा समावेश आहे.

यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला

यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पोफाळी अंतर्गत येणाऱ्या या तरोडा गावात माणुसकीला कलंकित करणारी घटना घडली आहे. हे गाव सधन संपन्न असले तरी गावात अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे. त्यामुळेच भानामती, करणी, जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण करीत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनायक भोरे आणि निर्मला भोरे अशी पीडित दाम्पत्याची नावे आहेत. भोरे दाम्पत्यावर गावातीलच काही लोकांनी जीवघेणा हल्ला चढविला. या वृद्ध दाम्पत्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्यांचे घर जमावाने पेटवून दिले. दरम्यान कसा बसा जीव वाचवून भोरे दाम्पत्य पळाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (MNS worker beaten by BJP workers in Chikhali, Incident captured on CCTV)

इतर बातम्या

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना अटकेपासून तूर्त दिलासा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Parambir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा; 9 मार्चपर्यंत चौकशीला स्थगिती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.