आणखी शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक कोण, खासदार जाधवांनी दाखविलं यांच्याकडं बोट

मी जे आरोप मातोश्रीवर केले, ते पोलिसांत सिद्ध झालेत.

आणखी शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक कोण, खासदार जाधवांनी दाखविलं यांच्याकडं बोट
खासदार जाधवांनी दाखविलं यांच्याकडं बोटImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 3:20 PM

गणेश सोळंकी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : खासदार प्रतापराव जाधव यांनी मातोश्रीवर लावलेले आरोप फेटाळलेत. ते म्हणाले त्यावेळेस विरोधकांनी सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले. त्यांना पाठीशी घालण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले होते. बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी काल आपल्या भाषणामध्ये मातोश्रीवर शंभर खोके जायचे असा आरोप केला होता. मात्र आज खासदार जाधव यांनी केलेला आरोप फेटाळला. ज्यावेळी अनिल देशमुख आणि सचिन वाझेंवर आरोप झाले त्यावेळी विधानसभेमध्येसुद्धा उद्धव ठाकरे यांनी वाझे यांची बाजू घेतली होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला नव्हता.

यावेळी विरोधक त्यांचा राजीनामा मागत होते. मात्र आज दोघेही जेलमध्ये आहेत. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होते. मी जे आरोप मातोश्रीवर केले, ते पोलिसांत सिद्ध झालेत, अशाप्रकारे जाधव यांनी यू टर्न घेतलाय.

स्थानिक काही अडचणी

अजूनही शिंदे गटात येण्यासाठी काही खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिंदे साहेबांच्याही संपर्कात आहेत. मात्र सध्या त्यांच्या स्थानिक काही अडचणी आहेत. ज्या दिवशी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल, द्या दिवशी सर्वच्या सर्व लोक आमच्याकडे येतील, असा दावाही त्यांनी केला.

कोण-कोण संपर्कात आहे असं जाधव यांना विचारण्यात आले. तेव्हा जाधव यांनी गजानन किर्तीकर यांच्याकडे बोट दाखवलं. किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडं त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखविली. त्यामुळे किर्तीकर संपर्कात आहेत, असंच म्हणावं लागेल.

पुराव्याशिवाय आरोप करू नये

सामनाने केलेल्या शिंदे यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या दाव्यावर जाधव म्हणाले, पुराव्याशिवाय आरोप करणे चुकीचे आहे. कोणालाही कुठे जायचे असेल तर ते पक्षाप्रमुखाला विचारल्याशिवाय कुठेही जात नाही.

एकनाथ शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. सर्वानाच आनंद दिघे होता येत नाही, हे बरोबर आहे, असंही खासदार जाधव म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.