बुलडाणा : दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीररित्या जखमी झाला. ही घटना नागपूर- मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव शहराजवळ घडलीय. यावेळी पोलीस (Police) घटनास्थळी लवकर पोहचले नाही. म्हणून नागरिकांनी काही काळ रास्तारोको (Rastaroko) केला होता. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खामगाव तालुक्यातील लोखंडा-पाळा येथील दोघे दुचाकीने जात होते. राष्ट्रीय महामार्ग (Highway) क्रमांक 6 वरील मोठ्या हनुमान मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील गजानन श्रीपाद वानखेडे हे जागीच ठार झाले. पुंजाजी आनंद पवार हा गंभीररित्या जखमी झाला.
जखमीला नागरिकांनी उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक खोळबंली होती. घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अर्धातास रास्तारोको केला. यामुळे देखील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक खोळंबली असताना पोलीस कुठे गेले होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. एरवी दुचाकी अडवून त्यांच्याकडून वसुली करण्यात वाहतूक पोलीस तत्पर असतात. अपघात झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल संतप्त नागरिकांनी केला.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पोलिसांना कळविण्यात आले. पण, पोलीस उशिरा आल्यानं संतप्त नागिराकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळं सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी पोलीस पोहचले. रस्त्यावर दुचाकी पडली होती. मृतक बाजूलाच पडून होता. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळं वाहतूक खोळंबली होती. याचा त्रास प्रवास करणाऱ्या नागरिकांना झाला. याचा रोष त्यांनी शेवटी पोलिसांवर काढला.