Buldana : बुलढाणा जिल्ह्यातील 6342 शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी 321 पद रिक्त, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरूच…

आधीच गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, यावर्षी कोरोना अटोक्यात आल्याने शाळांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने शाळा परत एकदा सुरू झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पद असल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Buldana : बुलढाणा जिल्ह्यातील 6342 शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी 321 पद रिक्त, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरूच...
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 8:27 AM

बुलढाणा : भारतात (India) दोन वर्षांपूर्वी कोरोनाने कहर केल्याने शाळा आॅनलाईन पध्दतीनेच सुरू होत्या. मात्र, ग्रामीण भागामध्ये मोबाईल, लॅपटाॅल आणि इंटरनेट नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. आता कोरोनाचे (Corona) रूग्ण कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतू, बुलढाणा जिल्हात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान (Damage) होतयं. जिल्ह्यात 6342 शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी 321 पद रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असले तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसते आहे.

शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान

आधीच गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, यावर्षी कोरोना अटोक्यात ल्याने शाळांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने शाळा परत एकदा सुरू झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पद असल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, आणि त्यामुळेच अनेक गावांमध्ये शिक्षक मिळण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडून विविध आंदोलने केली जात आहेत.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1403 प्राथमिक तर 35 माध्यमिक शाळा

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1403 प्राथमिक तर 35 माध्यमिक अशा एकूण 1438 शाळा आहेत. ज्यामध्ये मराठी प्राथमिक शाळेवर 5609 तर उर्दू माध्यमावर 733 असे एकूण 6342 पदे मंजूर आहेत. त्यापैकी मराठी आणि उर्दू मिळून 6021 शिक्षक कार्यरत असून 321 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सोबतच मराठी आणि उर्दू शाळेवरील मुख्याध्यापकांच्या 429 मंजूर पदांपैकी 168 पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात पालकांकडून वारंवार शिक्षणाधिकारी कार्यालयासोबत संपर्क केला जातोय. इतकेच नाही तर आंदोलनही केली जात आहेत.

शाळेला शिक्षक मिळण्यासाठी ग्रामस्थाचे आंदोलन

शिक्षणाधिकारी स्तरावर शिक्षक नेमणुकीचे अधिकार नसल्याने शिक्षकांची नेमणूक ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त पदांसंदर्भात वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे, ज्या पद्धतीने जिल्ह्याला शिक्षक उपलब्ध होतील तसे जिल्ह्यात शाळेतील रिक्त पदांनुसार शिक्षक उपलब्ध करून दिल्या जातील, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. मात्र, अजूनही जिल्हातील शाळेंमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात न आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.