Prediction of Rain – पहाटे जाहीर होणार बुलडाण्याच्या भेंडवळची भविष्यवाणी, वर्षाचे पावसाचे भाकीत जाहीर होणार

पावसाची आणि शेतातील पिकांबद्दल जी भविष्यवाणी केली जाते त्याला अनन्यसाधारण महत्व आहे

Prediction of Rain - पहाटे जाहीर होणार बुलडाण्याच्या भेंडवळची भविष्यवाणी, वर्षाचे पावसाचे भाकीत जाहीर होणार
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 7:53 PM

बुलडाणा – येत्या वर्षात पाऊस-पाणी कसे असेल, पिकांची स्थिती काय असेल, राज्यावर-देशावर काय संकटं येणार, या सगळ्याची उत्सुकता शमवणारी आणि भविष्याचा अंदाज व्यक्त करणारी बुलडाण्याची प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी बुधवारी पहाटे जाहीर होणार आहे. (Indian Meteorological Department) भारतीय हवामान विभागाने यंदाही सरासरीच्या तुलनेत अधिकच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा शास्त्रशुध्द पध्दतीने वर्तवलेला अंदाज असला तरी भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने (Rain forecast) पावसाची आणि शेतातील पिकांबद्दल जी भविष्यवाणी केली जाते त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अशीच भविष्यवाणी (Buldana) जिल्ह्यातील भेंडवळ येथे घटमांडणी रुपाने केली जाते. गेल्या 300 वर्षापासून ही भविष्यवाणी केली जाते. एवढेच नाही तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारे ही घटमांडणी असते. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली गेली. या घटमांडणीचे भाकीत बुधवारी पहाटे वर्तवण्यात येणार आहे. या घट मांडणीच्या भाकीताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकिय नेत्यांचेही लक्ष असते.अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मंगळवारी संध्याकाळी पुंजाजी महाराज यांच्या हस्ते शेतातील जमिनीत खड्डा खोदून घटमांडणी करण्यात आली . पहाटे पुंजाजी महाराज वाघ हे शेती ,राजकारण,आरोग्य,आर्थिक घडामोडी आदी विषया संदर्भात भाकीत व्यक्त करणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी भेंडवळ मध्ये दाखल झाले आहेत.

भेंडवळची घट मांडणी म्हणजे काय?

भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य,पृथ्वीवरील संकटे, राजकारणाविषयी वर्षभराचा अंदाज वर्तवला जात असतो.त्यामुळे साहजिकच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे डोळे भेंडवळच्या वार्षिक भाकिताकडे लागलेले असते. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर परिसरातील शेतकऱ्यांनच्या उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता या घटमांडणीला प्रारंभ झाला होता. 4 मे रोजी सकाळी या घटमांडणीची भाकीत जाहीर केली जाणार आहे. पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ या चार हजार लोकसंख्येच्या या गावात अक्षय तृतीयेला घट मांडण्याची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षापासून सुरू आहे अस ग्रामस्थ सांगतात. घटमांडणीची परंपरा सुरू करणारे चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज भाकीत जाहीर करतात.

अशी केली जाते घट मांडणी.

अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर आणि करडी अशा 18 प्रकारची धान्ये ठेवण्यात येतात तर मध्यभागी 4 मातीचे ढेकळे ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर असते.घागरीवर पान-सुपारी, पुरी, पापड, चांडोली खुर्द, भजे, वडे हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर या ठिकाणी कोणीही जात नाही, दुसऱ्या दिवशी पहाटे घटामध्ये झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविले जाते. त्यावरून पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी यंदा कोणती पिके घ्यायची हे ठरवत असतात. चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली परंपरा पुंजाजी महाराज यांनी आजही कायम ठेवली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीही गावातील हनुमान मंदिराच्या पारावर मांडणी केली जाते. या दोन्ही मांडणीमध्ये साम्य असते त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निष्कर्ष एकत्र जोडून वर्तवली जातात.

हे सुद्धा वाचा

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....