Buldana Crime | रोहिणखेडच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले, सात आरोपी जेरबंद; आरोपींवर विविध गुन्हे दाखल

| Updated on: Apr 28, 2022 | 3:52 PM

आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सात आरोपींना बुलडाणा पोलिसांनी अटक केली. चार लाख रुपयांचे दागिने जप्त केले.

Buldana Crime | रोहिणखेडच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले, सात आरोपी जेरबंद; आरोपींवर विविध गुन्हे दाखल
आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीच्या बुलडाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Image Credit source: tv 9
Follow us on

बुलडाणा : धामणगाव बढे पोलीस (Dhamangaon Badhe Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहिणखेड येथील एका सराफा व्यावसायिकाला लुटून, त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी विविध अंगाने तपास करत, जालना – औरंगाबाद आणि बुलडाणा अशा तीन जिल्ह्यांतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोना चांदीचे दागिने एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तिघांवर विविध जिल्ह्यात खून, दरोडा, जबरी चोरी असे विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने (Court) सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस (Police Cell) कोठडी सुनावली आहे. त्यामध्ये अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्यापाऱ्याला लुटल्याची कबुली

दरोडा, जबरी चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलय. बुलडाणा जिल्ह्यातील एका सराफा व्यावसायिकाला लुटल्याची कबुली या आरोपींनी दिली. आरोपींकडून सोन्या-चांदीचे एकूण चार लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. जालना, औरंगाबाद आणि बुलडाणा या जिल्ह्यातले आहेत. त्यामुळं तपास करताना पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. पण, त्यात ते यशस्वी झाले. या सातही आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहेत.

चार लाखांचा माल जप्त

ही आंतरजिल्हा चोरी करणारी टोळी दिसून येते. अधिक तपास केल्यानंतर यांनी आणखील काय काय कारनामे केले, याची माहिती मिळेल. त्यामुळं पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत. न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडून चार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळं आणखी बऱ्याच ठिकाणी यांनी लुटमार केली असावी. कसून तपास केल्यानंतर यांच्याकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.