Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana Social Unity | रक्तासाठी भटकत होते सविताचे कुटुंबीय, अंजूम या मुस्लीम महिलेनं रक्तदान केल्यानंतर झाली शस्त्रक्रिया; हिंदू-मुस्लीम हे तर रक्ताचे नाते…

माहिती मिर्झानगर येथील शेख फारुख शेख हारून यांना मिळाली. त्यांचाही ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह होता. मात्र त्यांनी गेल्या आठवड्यातच रक्तदान केले होते. रुग्णाची परिस्थिती आणि गरज लक्षात घेता त्यांनी आपली बहीण राहत अंजुम शेख हारून यांना रक्तदान करण्याची विनंती केली.

Buldana Social Unity | रक्तासाठी भटकत होते सविताचे कुटुंबीय, अंजूम या मुस्लीम महिलेनं रक्तदान केल्यानंतर झाली शस्त्रक्रिया; हिंदू-मुस्लीम हे तर रक्ताचे नाते...
अंजूम या मुस्लीम महिलेनं रक्तदान केल्यानंतर झाली शस्त्रक्रियाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 3:34 PM

बुलडाणा : खरंतर राज्यातील आताचे राजकीय नेत्यांचे वक्तव्य पाहिले तर सामाजिक तेढ निर्माण होईल, अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र या निमित्ताने आजही क्रांतिवीर या हिंदी चित्रपटातील नाना पाटेकर यांचा डायलॉग अजूनही आठवतो.. ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून, बता इस मे कोनसा हिंदू का, और कोनसा मुसलमान का, बनानेवाले ने इसमे फरक नही किया, तो तू कोण होता है इस्मे फरक करने वाला… आणि याचेच जीवंत उदाहरण बुलडाण्यात पाहायला मिळाले. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) शस्त्रक्रियेसाठी भरती असलेल्या एका महिलेला रक्ताची नितांत गरज भासली. यासाठी एक मुस्लीम भगिनी (Muslim Sister) समोर येऊन तिने रक्तदान करत, सामाजिक एकतेचे ( Social Unity) दर्शन घडवले आहे.

रक्तासाठी धावाधाव

रामराव बोर्डे हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमधील भांडुप येथे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र ते गेल्या काही महिन्यांपासून बुलडाणा शहरात राहण्यासाठी आले. त्यांची मुलगी सविता इंगळे हिला गर्भ पिशवीचा आजार असल्याने तिला शस्त्रक्रियेसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. अशातच या महिलेला खूप कमी प्रमाणात आढळून येत असलेला ओ निगेटिव्ह या रक्तगटाची नितांत गरज भासली. त्यामुळे रामराव बोर्डे यांनी रक्तासाठी शोधाशोध सुरू केली.

अंजूम यांची रक्तदानाची पहिली वेळ

ही माहिती मिर्झानगर येथे राहणारे शेख फारुख शेख हारून यांना मिळाली. त्यांचाही ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह होता. मात्र त्यांनी गेल्या आठवड्यातच रक्तदान केल्याने, रुग्णाची परिस्थिती आणि गरज लक्षात घेता त्यांनी आपली बहीण राहत अंजुम शेख हारून यांना रक्तदान करण्याची विनंती केली. राहत अंजुम यांनी देखील रूग्ण कुठल्या समाजाचा आहे, हे न पाहता क्षणाचाही विलंब न करता रक्तदानासाठी होकार दिला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या मुस्लीम भगिनीची रक्तदानाची ही पहिलीच वेळ होती. या मुस्लीम भगिनीने आपल्या दुसर्‍या समाजाच्या भगिनीला रक्त देऊन तिचे प्राण वाचवले आहेत. आजही राज्यासह देशामध्ये धार्मिक राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. परंतु त्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त समाज एकत्र जोडून ठेवण्याचे सकारात्मक विचार देखील समाजात आहेत, याची प्रचिती या उदाहरणावरून दिसून येते. कुठल्याही दोन समाजाचे नव्हे तर सर्व मानवजातीचे रक्ताचे नाते आहे, असेच म्हणावे लागेल.

हे सुद्धा वाचा

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.