Buldhana : खामगावातील लक्कडगंज भागात माकडांचा हैदोस, पिसाळलेल्या माकडांमुळे नागरिकांमध्ये भीती

मुलींची कमी होत जाणारी संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे, असे असताना खामगाव येथील महात्मा फुले जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 एका वर्षात जन्मलेल्या मुलांचा आकडा जरी अधिक असला तरी मुलींचा जन्मदर वाढलेला आहे.

Buldhana : खामगावातील लक्कडगंज भागात माकडांचा हैदोस, पिसाळलेल्या माकडांमुळे नागरिकांमध्ये भीती
buldhana monkey attackImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 10:02 AM

बुलढाणा : जिल्ह्यातील विविध घडामोडी आपण एका क्लिकवर पाहणार आहोत, बुलढाण्यातील खामगाव (buldhana khamgaon) शहरातील लक्कडगंज भागात चार ते पाच दिवसांपासून माकडांचा हैदोस सुरु आहे. त्यापैकी एका पिसाळलेल्या माकडाच्या हल्ल्यात (Attacked by a monkey) चार ते पाच नागरिक जखमी झाले आहेत. माकडं घरात घुसून हल्ला करीत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाला या घटनेची माहिती मिळताचं यातील एक माकड वनविभागाने रेस्क्यू करून जंगलात सोडले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अजूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात माकडांचा वावर असल्याने त्यांचाही बंदोबस्त वनविभागाने (Forest Department) करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे 80 दुकानांचे बांधकाम

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील गट क्रमांक 915 मधील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे 80 व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे, याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते गोपाल शिराळे यांनी ग्रामपंचायतकडे केल्यानंतर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांना ग्रामपंचायत कडून नोटीस देण्यात आली आहे. येत्या सात दिवसात केलेले अतिक्रमण तात्काळ तोडण्यात यावे,अन्यथा ग्रामपंचायतच्यावतीने हे अतिक्रमण तोडून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आला आहे.

वर्षभरात 2 हजार 323 मातांनी दिला मुलींना जन्म…

मुलींची कमी होत जाणारी संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे, असे असताना खामगाव येथील महात्मा फुले जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 एका वर्षात जन्मलेल्या मुलांचा आकडा जरी अधिक असला तरी मुलींचा जन्मदर वाढलेला आहे. हा वाढलेला जन्मदर एक प्रकारे शुभ वर्तमान म्हणावा लागेल. सामान्य रुग्णालयात वर्षभरात 2 हजार 446 मुलांचा तर 2 हजार 323 मुलींचा जन्म झाला आहे अशी माहिती डॉ. नीलेश टापरे, वैद्यकीय अधीक्षक, खामगाव यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा जिल्ह्यात क्राईमच्या सुध्दा घटनेत रोज वाढ होत आहे. रोज घडना घडत असल्यामुळे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.