या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाच्या खासदाराची वर्णी, आणखी शिंदे गटाला अपेक्षा काय?

राज्यातही भाजप-शिवसेना युतीचं सरकार आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला झुकतं माप मिळत आहे.

या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाच्या खासदाराची वर्णी, आणखी शिंदे गटाला अपेक्षा काय?
खासदार प्रतापराव जाधवImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 4:54 PM

राहुल झोरी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : केंद्राकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाला एक गिफ्ट मिळालं. खासदार प्रतापराव जाधव यांना हे गिफ्ट मिळालं. केंद्र सरकारच्या आणि लोकसभेच्या नियमाप्रमाणं 12 सप्टेंबरला समित्यांची पुनर्रचना होते. त्याच्यात फारसे बदल होत नसतात. पण, समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांची मागची कारकिर्द वादग्रस्त राहिली. हक्कभंगाचे प्रस्ताव त्यांच्यावर टाकले गेले. केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान समितीचं अध्यक्षपदं देण्यात आलंय. यापूर्वी खासदार जाधव हे ग्रामविकास आणि पंचायत राज समितीचे अध्यक्ष होते.

केंद्र सरकारच्या काही मोठ्या स्थायी समित्या आहेत. त्यापैकी माहिती आणि तंत्रज्ञान अशी ही समिती आहे. चार मंत्रालयं या समितीअंतर्गत येतात. दसऱ्याचं हे गिफ्ट खासदार प्रतापराव जाधव यांना मिळालं.

यासंदर्भात खासदार जाधव म्हणाले, केंद्रात आता आम्ही एनडीएचा घटकपक्ष आहोत. राज्यातही भाजप-शिवसेना युतीचं सरकार आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला झुकतं माप मिळत आहे.

या समितीचं काम मोठं आहे. मोठी जबाबदार आहे. चांगलं काम करण्याची संधी आहे. ग्रामीण आणि शहरी भागाचा यात समावेश आहे. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं.

2019 निवडणुकांनंतर सत्ता स्थापन करताना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं सरकार स्थापन झालं. भाजप केंद्रात सत्तेत होता. पण, राज्यातून समन्वय योग्य पद्धतीनं ठेवला गेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत यायचे. तेव्हा प्रोटोकॉलनुसार, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वागताला जाणं अपेक्षित असायचं. त्यासाठी मुख्यमंत्री जात नव्हते. कुठलाही विषय आला तरी ते केंद्र सरकारवर ढकलायचे.

आताचे मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत समन्वय साधत आहेत. राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य होईल, अशी अपेक्षा खासदार जाधव यांनी व्यक्त केली.

स्थायी समितीचं पद आलंय. आता एनडीएचा सगळ्यात मोठा घटकपक्ष आहे. 12 खासदार आहोत. त्यामुळं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद, अशी आशा शिंदे गटाला आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.