भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत; शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलनावरून आमदार संजय गायकवाडांचा निशाणा

भाजप नेते माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता या टिकेला  बुलडाण्यामधील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत; शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलनावरून आमदार संजय गायकवाडांचा निशाणा
संजय गायकवाड
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:10 AM

भाजप नेते माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. आता या टिकेला  बुलडाण्यामधील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत असल्याचे म्हणत त्यांनी अनिल बोंडे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शरद पवार साहेबांच्या कामाची उंची हे कधीच समजू शकत नाहीत. शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना उभं करण्याचे काम केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची जोड दिली. केंद्रीय कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. हे धाडस फक्त शरद पवार हेच करू शकतात.  शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, मात्र ते कधीही कोणाला वाईट बोलले नाही. त्यांच्या घरावर अशापद्धतीने हल्ला होणे हे दुर्दैवी असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

हल्ल्याचा प्रकार दुर्दैवी

पुढे बोलताना गायकवाड यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांनी आपली संबंध हायात जनतेच्या सेवेसाठी घालवली, पवार यांनी कोणालाही कधी अपशद्ब वापरला नाही, मग पवार यांच्या घरावर हल्ला का करण्यात आला. हा प्रकार दुर्दैवी आहे. हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्याच्या एका तुकडीकडून करण्यात आले, हे आंदोलन पूर्वनियोजीत पद्धतीने करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप राज्यातील सरकार अस्थिर करून पहात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

सदावर्तेंच्या सांगण्यावरून हल्ला

दरम्यान संजय गायकवाड यांनी या हल्ल्यासाठी भाजप आणि गुणरत्न सदावर्ते यांना जबाबदार ठरवले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन झाल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. गेल्या अडची वर्षांपासून याना त्या कारणाने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात हिंसा निर्माण करून, त्यांचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव आहे, मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, विरोधक त्यांच्या कामामध्ये कधीही यशस्वी होणार नसल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

अखेर रॉबर्ट वाड्रा राजकारणात; प्रियंका गांधींसोबत करणार काम, प्रियंका देशाचे भवितव्य असल्याचे प्रतिपादन

Sharad Pawar : राज्य आमच्या हातात आलं म्हणून एक गट अस्वस्थ, आंदोलनाचा दोष कर्मचाऱ्यांना नाही, पवारांचा थेट इशारा कुणाकडे?

सोमय्यांसोबत खडसेंचं ये दोस्ती नहीं तोडेंगे, तर फडणवीसांना दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे…

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....