गेल्या 75 वर्षात एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री झाला नाही; शिवसेनेच्या आमदाराने संजय राऊत यांना ठणकावून सांगितले

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका करण्यात आली तर होणाऱ्या सभा उधळून लावू असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला देण्यात आला आहे.

गेल्या 75 वर्षात एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री झाला नाही; शिवसेनेच्या आमदाराने संजय राऊत यांना ठणकावून सांगितले
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 9:29 PM

बुलढाणा : ज्यांची लायकी नसतात, ते मुख्यमंत्री होतात अशा शब्दात एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता त्यावरूनच आता राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे उद्या महाविकास आघाडीची सभा जळगावमध्ये होत आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली जाते. त्यामुळे आता जळगावमधील शिवसेनेने जर मुख्यमंत्री एनकाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कुणी टीका केली तर मात्र महाविकास आघाडीची सभा उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्यामुळेच आता ठाकरे गट आणि शिवसेनेतील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. आमदार संजय गायकवाड, मंत्री गुलाबराव पाटील, आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून संजय राऊत यांचा समाचार घेण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनीही त्यांना खडे बोल सुनावत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा इतिहासच त्यांनी सांगितला.

महाराष्ट्राच्या इतिहासात असा मुख्यमंत्री होणार नाही आणि झाला नाही अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना ठणकावून सांगितले आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी आधी लोकांमधून निवडून येऊन दाखवावे. नंतर इतर लोकप्रतिनिधींची लायकी काढावी असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांना त्यांच्या कामाचा धडाका बघूनच त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर ते टीका करत आहेत अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका करण्यात आली तर होणाऱ्या सभा उधळून लावू असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला देण्यात आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.