“…मग फडतूससोबत मागचे पाच वर्षे कसे राहिला?”; शिवसेनेच्या नेत्यानं युतीच्या दिवसांची आठवण करून दिली

ज्या पवित्र मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव औरंगजेबाच्या विचाराच्या लोकांसोबत जात असल्यामुळेच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

...मग फडतूससोबत मागचे पाच वर्षे कसे राहिला?; शिवसेनेच्या नेत्यानं युतीच्या दिवसांची आठवण करून दिली
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 3:08 PM

बुलढाणा : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना फडतूस शब्द वापरला होता. त्यावरून आता भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. फडतूस गृहमंत्री लाभल्याची टीका केल्यानंतर त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आता भाजपसह शिवसेनेतील नेतेही आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला एकनाथ शिंदे चालले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली होती, मात्र आता लगेच त्यांचे तुम्हा वावडे वाटायला लागले. आणि मागील सहा महिन्यात तुम्हाला ते लगेच गुंड का वाटू लागतात असा सवालही संजय गायकवाड यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली आहे, ती फक्त बाळासाहेबांच्या विचारासाठी त्यांनी बंडखोरी केली आहे.

बाळासाहेबांच्या विचारासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र तुम्ही आता काय करता तुम्ही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटायचे धंदे चालू केले आहेत असा घणाघातही त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी संजय राऊत यांनासुद्धा फैलावर घेतले आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी सीबीआय, ईडीवरून त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांना वाटते चुकीचे काम करतात, त्यांनी न्यायालयात जावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

संजय राऊत आपण इतरांना सल्ला देता पण आपण वात्रटपणा करतो असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. तुम्ही आता तुमचा थोडा बंदोबस्त तुम्ही पण बाजूला ठेवा, आणि मग बघा आमचे कार्यकर्ते काय करतात असा थेट इशाराच त्यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तुम्ही करत असलेल्या वायफळ बडबडीला आता लोकं कंटाळले आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ज्या पवित्र मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव औरंगजेबाच्या विचाराच्या लोकांसोबत जात असल्यामुळेच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

त्याबरोबरच विचित्र लोकं बाळासाहेबांच्या विचारांशी लोकं जोडायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच नाराज झालेल्या लोकांनी मैदानावर गोमूत्र शिंपडले असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी गोमूत्र प्रकरणावर दिले आहे. मात्र या गोष्टीचे आम्ही समर्थन करत नाही मात्र ही गोष्ट निश्चितपणे निषधार्य असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम्ही त्यांना फडतूस गृहमंत्री म्हणून त्यांच्याव टीका करता मग फडतूससोबत मागचे पाच वर्षे कसे राहिले असा खोचक सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी टीका करताच संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

त्यांच्या टीका करताना ते म्हणाले की, त्या संजय राऊतला विसर पडला असेल भडव्याला की मागच्या वेळी अयोध्येला जायचे होते तर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना विमान करून दिले होते. या गोष्टीचे आम्ही साक्षीदार होतो असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

तर याचेवळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी नपुंसक सरकार म्हणून त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, लाज वाटते अशा नेत्यांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडल्यावर.त्यामुळे येणाऱ्या काळातच समजेल की, कोण सरकार आणि कोण नपुंसक असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.