“येत्या काळात राज्यात किती अणुबॉम्ब पडतील याची भविष्यवाणी न केलेलीच बरी”; शिवसेनेच्या आमदाराने भविष्यवाणी सांगितली
बुलढाणा शहरात सुरु असलेल्या विकास कामांवरूनही त्यांनी आमदार धीरज लिंगाडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बुलढाणा शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे अडथळा निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
बुलढाणा : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे ठाकरे गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बोलले जात आहे. त्यातच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही राजकीय बॉम्ब फुटणार असल्याचे वक्तव्यत केले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनीही राज्याच्या राजकारणात आता असे किती बॉम्ब पडतील हे न सांगितलेलेच बरे असंही वक्तव्य त्यांनी केल्याने आता त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना घेऊन काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात अणुबॉम्ब टाकला होता. त्यामुळे येत्या काही दिवसात तसे अणुबॉम्ब कितीतरी पडतील याची भविष्यवाणीच न केलेलीच बरी असं आमदार संजय गायकवाड यांनी सांगितल्याने आता अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर संजय गायकवाड यांनीही असे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी कोण कोणत्या घडामोडी घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला.
प्रकाश आंबेडकर असं जर म्हणत असतील तर त्यांना काहीना काही माहिती असेल म्हणूनही त्यांनी तशी वक्तव्य केली असतील असंही त्यांनी यावेळी म्हटले.
त्यामुळे पंधरा दिवसात दोन मोठे बॉम्ब स्फोट होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणत असतील तर ते जबाबदारीनेच बोलत असतील असंही त्यांनी यावेळी विश्वासने सांगितले.
यावेळी त्यांनी बुलढाणा शहरात सुरु असलेल्या विकास कामांवरूनही त्यांनी आमदार धीरज लिंगाडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बुलढाणा शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे अडथळा निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
अधिकाऱ्यांना धमक्या देत असल्याचा आरोप करत धमक्या देणाऱ्याला आडव पाडून पुढे जाणार असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
माझा मुख्यमंत्री आहे माझं सरकार आहे मी ढवळाढवळ करू देणार नाही असा इशाराही आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांना दिला आहे.
तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमावर बोलताना त्यांनी सांगितले की, घडलेली घटना ही नैसर्गिक आहे त्याला कोणीही जबाबदार नसल्याचे आमदार गायकवाड म्हणाले आहेत.