ठाकरे गटातील आणखी इतके आमदार, खासदार शिंदे गटात येणार; प्रतापराव जाधव यांनी सांगितलं

निकाल आल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच आता आरोप केले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतः स्पष्ट करावं ते सकाळी खरं बोलत होते का संध्याकाळी खोटे बोलत होते ? खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना हा सवाल केला.

ठाकरे गटातील आणखी इतके आमदार, खासदार शिंदे गटात येणार; प्रतापराव जाधव यांनी सांगितलं
खासदार प्रतापराव जाधव
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 2:17 PM

बुलढाणा : खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत. त्यावर संजय राऊत यांना पैसे देऊन उद्धव ठाकरे यांनी फक्त बोलायला ठेवले आहे. असा पलटवार बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटातील आठ ते नऊ आमदार आणि दोन खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडून या निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका करण्यात आली होती. यावर बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत यांना भाटगिरीसाठी ठेवलंय

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी पैसे देऊन भाटगिरी करण्याकरता ठेवलेला आहे. संजय राऊत हे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. संजय राऊत यांनी आता खासदारांना 100 कोटी दिल्याचा आरोप केल्यानंतर संजय राऊत यांचे गणित कच्चं दिसत असल्याचं सांगत संजय राऊत यांनी आमच्यावर ३०० खोक्यांचा आरोप केला पाहिजे होता. कारण की एक खासदार हा सहा आमदारांचे प्रतिनिधित्व करते असं म्हणत संजय राऊत यांची खासदार प्रतापराव जाधव यांनी खिल्ली उडवली आहे.

ते सकाळी की, संध्याकाळी खरे बोलतात

निवडणूक आयोगाच्या निकालाआधी संजय राऊत न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे म्हणत होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच आता आरोप केले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतः स्पष्ट करावं ते सकाळी खरं बोलत होते का संध्याकाळी खोटे बोलत होते ? खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना हा सवाल केला.

एकनाथ शिंदे यांची ताकद ओळखण्यासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कमी पडलेत. म्हणून त्यांच्यावर आज लाचारीचे दिवस आलेत. खासदार प्रतापराव जाधव यांचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर असाही घणाघात केला.

शिवसेना भवन कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे असल्यामुळे गाव पातळीवरचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे आमच्या शिवसेनेचेचं. आता त्यांना ठाकरे गटाकडे जायचं असेल तर इकडून तिकडे जावं लागेल, असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. ते शिवसेनेचीच असल्याचं म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना भवनासह शिवसेनेच्या शाखांवर दावा केला आहे.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.