“फडणवीस,बावनकुळे खरचं तुमची औकाद आहे का?”; ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजप-शिवसेनेवर घणाघात

चंद्रशेखर बावनकुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नका असा इशारा त्यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांना देण्यात आला आहे.

फडणवीस,बावनकुळे खरचं तुमची औकाद आहे का?; ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजप-शिवसेनेवर घणाघात
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 4:35 PM

सोलापूर : गेल्या चार दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राज्यातील भाजप आणि ठाकरे गट आक्रमक होत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना काही नेत्यांनी त्यांना राज्यात फिरताना अवघड होईल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना इशारा देण्यात आला होता.

त्यावर बोलताना सोलापूरचे ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांची देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्यावर बोलतान लक्ष्मण हाके यांनी त्यांची त्यांची लायकी विचारत खरंच तुमची औकाद आहे का? असा सवाल त्यांनी त्यांना केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण फडतूस या शब्दावरून तापले असल्याचे दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार घणाघात करत लक्ष्मण हाके यांनी भाजपवर गंभीर आरोपही केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, 2014 ते 2019 च्या कालावधीत मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही पक्षातील एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना तुम्ही संपवला आहात त्यामुळे तु्म्हाला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

2014 पासून राज्यातील भाजपने आपल्याच नेत्यांवर राजकारण करून संपवण्याचे काम केले आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तर भाजपमधील अनेक नेत्यांना त्यांनी राजकारणातून संपवले आहे.

त्यामुळेच त्यांच्यावर नियतीने सूड उगवला आहे. त्यावर ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यावर नियतीने सूड उगवला असल्यामुळेच आणि त्यांची इच्छा नसतानासुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना राज्यात फिरताना मुश्किल होईल.

त्यांच्या या टीके नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधताना खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. बावनकुळे तुमचे तोंड आरश्यात बघा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही कसे दिसता असा पलटवारही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यापुढे ठाकरे कुटुंबीयांबद्दल काही बोलाल तर याद राखा असा थेट इशाराच त्यांनी त्यांना दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आभाळाचा मुका घ्यायचा किंवा लाथा मारायचा प्रयत्न करू नका अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

तसेच चंद्रशेखर बावनकुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नका असा इशारा त्यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांना देण्यात आला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.