मानसिक धक्क्याने शिक्षण संस्था अध्यक्षांचा मृत्यू, चौघांविरोधात मनु्ष्यवधाचा गुन्हा दाखल का?
पोलिसांनी अकोला येथील शैलेश खरोटे, सचिन कोकाटे, दीपक मसने, सचिन पोसपुर्वार या चौघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय.
गणेश सोलंकी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय मुरारका (Sanjay Murarka ) यांच्या जागेचा बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. यामुळं मानसिक धक्का लागून शेगाव येथील संजय मुरारका यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शहरवासीयांनी शेगाव पोलीस (Shegaon Police) स्टेशनमध्ये मोर्चा काढला. मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. या प्रकरणी शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा (Crime of Homicide) दाखल केलाय.
शेगाव येथे असलेल्या मुरारका जीन परिसरात काल काही लोकांचा जमाव अचानकपणे घुसला. त्यांनी त्याजागी खोदकाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. याबाबत संजय मुरारका यांच्या पत्नीने त्यांना हटकले.
तुम घर खाली करो, असे म्हणून धमकावण्यात आले. या गोष्टीचा मानसिक धक्का बसल्याने मुरारका कॉलेज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय मुरारका यांची तब्येत अचानक बिघडली. संजय मुरारका यांना मानसिक धक्का बसला. यावेळी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झालाय.
याची माहिती शहरात पसरतात शेगाव शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठले. जोपर्यंत मुरारका यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मुरारका यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली.
पोलिसांनी अकोला येथील शैलेश खरोटे, सचिन कोकाटे, दीपक मसने, सचिन पोसपुर्वार या चौघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय.
संस्था अध्यक्षाचा मृत्यू झाल्यामुळं संस्थेशी संबंधित लोकं एकत्र आले. त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यांनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. बळजबळीनं जागा बळकावण्याचा प्रयत्न आरोपींच्या अंगलट आला.