रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही अवैध उत्खनन, उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली ही कारवाई

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना सहानिशा करून कारवाई करण्यास सांगितले. परंतु, रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत नव्हती.

रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही अवैध उत्खनन, उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली ही कारवाई
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 3:31 PM

बुलढाणा : बांधकामासाठी रेतीचा वापर होतो. पण, ही रेती नदीत मर्यादित स्वरुपात असते. त्यामुळे प्रशासन पर्यावरणाचा विचार करून रेतीच्या उत्खननास परवानगी देतो. परंतु, काही जण अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक टिप्पर सुसाट वेगाने जात होता. त्यामध्ये रेती भरली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना सहानिशा करून कारवाई करण्यास सांगितले. परंतु, रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत नव्हती.

टिप्पर सुसाट वेगाने जात होता

जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीसह इतर नद्यांमधील रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. तरीही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याचे पाहायला मिळते. अवैध रेती वाहतूक करतानाचे टिप्पर सुसाट वेगाने जात असताना व्हिडिओ काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हे सुद्धा वाचा

या कर्मचाऱ्यांवर झाली ही कारवाई

अवैध रेती उत्खनन संदर्भात वारंवार सांगूनही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामे करून कारवाई होत नव्हती. कर्तव्यात हेतू पुरस्कार टाळाटाळ केल्याने सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी मोठी कारवाई केली. देऊळगाव राजा तालुक्यातील तलाठी डी एच दांडगे, एस डी वायाळ यांना निलंबित केले.

मंडल अधिकाऱ्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

मंडळ अधिकारी पी पी वानखेडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. ही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांवरील मोठी कारवाई आहे. रेतीमाफियांना अप्रत्यक्षरीत्या पाठबळ देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

बुलढाणाच नव्हे तर बहुतेक ठिकाणी रेतीची अवैध तस्करी केली जाते. त्यात स्थानिक तलाठी यांच्याशी संगनमत असते. तक्रार झाल्यानंतर प्रकरण पुढं येते. अन्यथा सारं काही सुरू असते. नुकतीच गडचिरोली येथे १६ ट्रक रेतीची अवैध वाहतूक करताना पकडले गेले. मोठी कारवाई करण्यात आली.

पण, प्रत्येक्षात बऱ्याच रेतीची अवैध चोरी होते. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते एकटे रेती तस्करांशी सामना करू शकत नाही. अन्यथा त्यांच्याच जीवावर बेतते, हीसुद्धा काही ठिकाणची वस्तुस्थिती आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.