बुलढाणा : राणे पिता पुत्रांकडून वारंवार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटावर टीका केली जाते. त्यावर ठाकरे गटातील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते, आताही राणे पिता पुत्रांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली गेली होती. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार करत नितेश राणे यांना बारक्या पोरांकडे आपण कुठं लक्ष द्यायचे म्हणून त्यांना थेट झटकून लावलं आहे. सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, लहान लेकरू आहे, आपण त्याच्याबद्दल नाही बोलायचे. काही लेकरांना सतत लक्ष वेधून घ्यायची सवय असते त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्य व्यक्तींवर टीका केली जाते.
त्यातच नारायणरावांच्या बारक्या लेकरांकडे भाजप लक्ष देत नाही म्हणून ही लहान लेकरं बोलतात असा जोरदार टोला सुषमा अंधारे यांनी राणे यांना लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर आणि त्यांच्या नेत्यांवर वारंवार टीकेची झोड उठवल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी त्यांनी केला आहे.
जे बोलणारे आहेत त्या नेत्यांकडून लेकी बोले सुने लागे अशी परिस्थिती असल्यामुळेच शिवसेनेच्या नेत्यांकडून हक्कभंग आणण्याचा विचार केला जातो आहे अशी टीका त्यांनी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे व पुत्रांसह त्यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावरही टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकलेल्या जमिनीवर आशिष शेलार यांनी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र आता शेलार चकार शब्द काढत नाहीत असा टोला त्यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना लगावला आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून जनता आमच्यासोबत आहे असं शिवसेनेच्या नेत्यांकडून जाहीरपणे सांगितले जाते.
मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशनच कवच सोडून खुल्या मैदानात येतील त्यावेळी त्यांना कळेल की लोकं नेमकी कोणाच्या पाठिशी आहेत असा जोरदार टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
ज्यावेळी या सगळ्यामधून बाहेर पडून हे नेते लोकासमोर जातील त्यावेळी लोकं त्यांना पन्नास खोके एकदम ओके या घोषणेनेच स्वागत करतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या की, आम्ही शत्रूला सुद्धा शुभेच्छा देणार असं म्हणत त्यांनी शिवसेनेलाही शुभेच्छा दिल्या आहेत.