सहा वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त पाहुणी म्हणून आली, बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा मृतदेहच सापडला

सहा वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त चिखली येथे आली होती. पण, त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे घरच्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी चिमुकलीला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, ती काही सापडली नाही.

सहा वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त पाहुणी म्हणून आली, बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा मृतदेहच सापडला
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 6:00 PM

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : उन्हाळ्याच्या शाळांना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे बच्चेकंपनी लग्नसमारंभानिमित्त गावाला जात आहेत. कुणी ग्रामीण भागात तर कुणी मामाच्या गावाला जात आहेत. सात वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त चिखली येथे आली होती. पण, त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे घरच्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी चिमुकलीला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, ती काही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चिमुकलीचा मृतदेह सापडला. त्यामुळे तिचा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या छोट्याशा मुलीने कुणाचे वाईट केले होते. या चिमुकलीला एवढी मोठी शिक्षा देणाऱ्या नराधमांविरोधात आंदोलनाच्या तयारीत चिखलीकर आहेत.

मृतदेह सापडल्याने खळबळ

जिल्ह्यातील रोहडा येथील तपोवन देवी परिसरात एका सहा वर्षीय चिमुकलीचा खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. या घटनेचा निषेध म्हणून उद्या चिखली शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

चिमुकलीचा शोध घेणे सुरू

सहा वर्षीय राधिका विलास इंगळे असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती बाळापूर येथील मूळनिवासी आहे. इंगळे कुटुंबीय परवाला आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखलीला आले होते. सकाळी 11 वाजल्यापासून ही चिमुकली हरवली होती. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात या चिमुकलीचा शोध घेणे सुरू होते.

मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी

अखेर काल सायंकाळी चिमुकलीचा मृतदेह तपोवन देवी मंदिर परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. सहा वर्षीय राधिकाचा खून कोणी केला ? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र या घटनेचा निषेध म्हणून आणि मारेकऱ्यांना तत्काळ अटक व्हावी, यासाठी उद्या चिखली शहरात बंद पुकारला आहे.

चिमुकलीचा खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. आता पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी किती वेळ लावतात. यावर नागरिकांचा संताप अवलंबून राहणार आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.