Buldana Police | मारहाणीत युवकाचा मृत्यू, सोनाला पोलिसांची कारवाई का नाही; आदिवासी धडकले पोलीस ठाण्यावर
लाठ्याकाठ्यांनी युवकाला मारहाण करण्यात आली. यात युवकाचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्यांची तक्रार करण्यात आली. पण, सोनाला पोलिसांची याची दखल घेतली नाही, असा आरोप आदिवासींना केलाय. याचा निषेध करण्यासाठी आज ते थेट पोलीस ठाण्यासमोरच धडकले.
बुलडाणा : जिल्ह्यातील हडीयामहल येथे एका युवकाची हत्या करण्यात आली. त्यामुळे आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवानी केली. पोलीस दिरंगाई करत असल्याने अखेर आदिवासी बांधवांनी सोनाला पोलीस (Sonala Police) स्टेशनला घेराव घातला. पोलिसांनी यावेळी आदिवासी लोकांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आदिवासी कारवाई होईपर्यंत हटणार नसल्याची भूमिका घेतली. मागील चार ते पाच दिवसांअगोदर लग्न समारंभात नाचताना धक्का लागला. म्हणून हडियामहल (Hadiyamahal) येथील रवी वास्केला या युवकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण (Assault) करण्यात आली. उपचारादरम्यान त्याचा मृत झाला. तर मारहाणीची तक्रार दिल्यावर ही कारवाई झाली नाही. त्याचा मृत्यू झाल्याने पोलीस स्टेशनवर आज आदिवासी बांधव धडकले. पोलिसांना घेराव घातला.
काय आहे प्रकरण
पाच दिवसांपूर्वी एक लग्नसमारंभ होता. त्याठिकाणी नाचताना धक्का लागला. याचा वचपा काढण्यासाठी लाठ्याकाठ्यांनी युवकाला मारहाण करण्यात आली. यात युवकाचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्यांची तक्रार करण्यात आली. पण, सोनाला पोलिसांची याची दखल घेतली नाही, असा आरोप आदिवासींना केलाय. याचा निषेध करण्यासाठी आज ते थेट पोलीस ठाण्यासमोरच धडकले.
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
सोनाला पोलिसांनी आरोपींवर कारवाई करणे गरजेचे होते. पण, त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं. यासंदर्भात तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसतील. तर ते काय कामाचे असा प्रश्न आदिवासी बांधवांनी केला. यासाठीच त्यांनी पोलीस ठाण्यासमोर घेराव दिला. यावेळी काही अनूचित घटना घडण्याची शक्यता होती. पण, परिस्थिती हाताळल्यामुळं आंदोलन शांततेत पार पडले. आदिवासी मात्र चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.