मॅनेजर दुचाकीने रक्कम घेऊन पळत होता; पोलिसांनी सीनेस्टाईल पाठलाग केला
पोलिसांनी पाठलाग करून संबंधित मॅनेजरला पकडले. पण, त्यासाठी तब्बल वीस किलोमीटरचा थरार पोलिसांना अनुभवावा लागला. मॅनेजर दुचाकीने जात होता. पोलीस गाडीने त्याचा पाठलाग करत होते.
बुलढाणा : मालक कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकतो.पण, कधीकधी काही कर्मचारी चोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वीही होतात. असाच एक प्रकार डोणगाव येथे घडला. मालकाचा मॅनेजरवर विश्वास होता. तो नेहमीप्रमाणे पेट्रोलपंपचा हिशोब द्यायचा. पण, काल रात्री त्याच्या मनात काहीतरी वेगळंच आलं. त्याने मालकाला भेट दिली. पण, पैसे दिले नाही. मालकाला संशय आला. पैसे न देताचं हा कसा गेला, असा प्रश्न मालकाच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पाठलाग करून संबंधित मॅनेजरला पकडले. पण, त्यासाठी तब्बल वीस किलोमीटरचा थरार पोलिसांना अनुभवावा लागला. मॅनेजर दुचाकीने जात होता. पोलीस गाडीने त्याचा पाठलाग करत होते. शेवटी त्याला गाठून त्याच्याकडून पैसे आणि गाडी जप्त केली. शिवाय त्यालाही ताब्यात घेतले.
मॅनेजर पैसे घेऊन पसार झाला
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील अतीयब पेट्रोपम्पवर ज्ञानेश्वर विलास हा मॅनेजर म्हणून काम करतो. ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे काल रात्री मालकाला दिवसभराचा पेट्रोल डिझेल विक्रीचा पैसा घेऊन हिशेब देण्यासाठी गेलाय. मात्र मालकाला पैसे न देताच मालकाला पाहून पुढे निघून गेला. त्याने मालकाच्या मनात शंकेची पाल चुकली. त्यांचा अंदाज खरा ठरला. मॅनेजर पैसे घेऊन पसार झाला होता. तेव्हा मालकाने पोलिसांना याची माहिती दिली. त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत मेहकर पोलिसांनी अटक केलीय.
पोलिसांनी केला सीनेस्टाईल पाठलाग
यावेळी परिसरातील नागरिकांना चोर पोलिसांचा थरार पाहायला मिळाला. मॅनेजरला पोलिसांनी विश्वासात घेत 20 किमीवर थांबवले आणि त्याच्याकडून चार लाख नगदी आणि मोटारसायकल जप्त केलीय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांचे कौतुक केले जात आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकी घेऊन मॅनेजर पुढे जात आहे. मागे पोलिसांची गाडी त्याचा पाठलाग करत आहे. चित्रपटातील हे दृश्य असावे असे वाटते.पण, हे प्रत्येक्षात घडलं आहे. हा सीनेस्टाईल थरार पाहून सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.