Jungle Safari : या अभयारण्यात बिबट्याची संख्या वाढली, सहजासहजी पर्यटकांना होतंय दर्शन, गर्दी वाढली
तुम्हाला बिबट्या पाहायचा आहे का ? या अभयारण्यात होतंय सहजासहजी दर्शन, पर्यटकांची गर्दी वाढली
बुलढाणा : आपण अनेकदा प्राणी (animal) पाहायच्या इराद्याने जंगलची सफारी (Jungle Safari) करतो. परंतु आपल्याला प्राणी दिसत नाही. परंतु काही लोकं नशिबवान असतात, त्यांना प्राणी पाहायला मिळतात. महाराष्ट्रात पर्यटन (maharashtra tourist) क्षेत्राचा विकास झाल्यापासून पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पण प्राणी दिसत नसल्यामुळे पर्यटक निराश व्हायचे. पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना प्राणी पाहायचे आहेत, त्यांनी ज्ञानगंगा अभयारण्याला भेट द्यावी. तिथं प्राण्याचं सहजासहजी दर्शन होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अस्वलांची संख्या अधिक असल्याने या अभयारण्याला अस्वलांचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. मात्र आता ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याची संख्या देखील 50 पेक्षा अधिक झाल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना सहजासहजी बिबट्याचे दर्शन होत आहे.
नुकतेचं पलढग डॅम परिसरात जंगल सफारी करत असताना काही पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. अभयारण्यात बिबट, अस्वल यासह विविध जाती प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वाढल्याने पर्यटकांचाही जंगल सफारीकडे कल वाढताना दिसत आहे.