आठ वर्षांच्या चिमुकल्याने असे काही केले की सर्वत्र होत आहे कौतुक

इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी नेहमीप्रमाणे प्रोत्साहित केले. त्यासाठी त्याला तयार केले. त्यामुळे तो आठ वर्षांचा असताना हा मोठा विक्रम करू शकला. यामुळे तनिष्कचे आता सर्वत्र स्वागत केले जात आहे.

आठ वर्षांच्या चिमुकल्याने असे काही केले की सर्वत्र होत आहे कौतुक
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 9:16 PM

संदीप वानखेडे, प्रतिनिधी, बुलढाणा : तनिष्क हा छोटासा चिमुकला. पण, त्याला थरारक अनुभव घेण्याची सवय लागली. तो स्वतःला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त करत गेला. त्याला साथ मिळाली ती त्याच्या वडिलांची. वडिलांना त्याला नेहमी प्रोत्साहन दिले. त्यामुळे तनिष्कच्या इच्छा, आकांशा वाढत होत्या. एक दिवस तर त्याने कळसुबाई शिखर सर करण्याची इच्छा आपल्या वडिलांना बोलून दाखवली. या चिमुकल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी नेहमीप्रमाणे प्रोत्साहित केले. त्यासाठी त्याला तयार केले. त्यामुळे तो आठ वर्षांचा असताना हा मोठा विक्रम करू शकला. यामुळे तनिष्कचे आता सर्वत्र स्वागत केले जात आहे.

चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक

परिश्रम आणि जिद्दीपुढे उंच आकाशही ठेंगणे होते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय बुलडाणा शहरातील एका चिमुकल्याने आणून दिलाय. तनिष्क माधव देशमुख या चिमुकल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच समजले जाणारे कळसुबाई हे शिखर यशस्वीपणे सर केले आहे. यामुळे चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

tanishk deshmukh 1 n कळसुबाई शिखर केला चार तासात सर

तनिष्क माधव देशमुख हा बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरमध्ये इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकत आहे. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा घेतली. 1 मे रोजी कळसुबाई शिखर सर करण्याबाबत निर्धार केला. ही गोष्ट त्याने वडील माधव यांच्याकडे बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा

5 हजार 427 फूट उंची गाठली

चिमुकल्या तनिष्कच्या इच्छेला वडिलांनी पाठबळ दिले. 5 हजार 427 फूट उंचीचे कळसुबाई शिखर गाठण्यासाठी वडिलांसोबत 1 मेच्या पहाटे त्याने कळसुबाई शिखराला पादाक्रांत करण्यासाठी चढाईला सुरुवात केली. तब्बल चार तासात तनिष्कने कळसुबाई शिखर सर केला.

इतक्या कमी वयात कळसुबाईसारखे अवघड शिखर गाठण्याचा बहुमान चिमुकल्या तनिष्क माधव देशमुख यांनी मिळवला. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनिष्क हा सहकार विद्या मंदिरचा विद्यार्थी. त्यामुळे शाळेतही त्याचे कौतुक होत आहे. यामुळे त्याला प्रेरणा मिळेल. त्यातून तो आखणी पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.