‘अपनी राणी किसी की दिवानी हो गई;’ व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून गजाननने स्वतःला संपवलं

ही गोष्ट युवकाला सहन झाली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला. आता कसं जगायचं असं त्याला वाटू लागलं. त्यातून त्याने टोकाचा निर्णय घेतला.

'अपनी राणी किसी की दिवानी हो गई;' व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून गजाननने स्वतःला संपवलं
गजानन गुरव
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 9:25 AM

बुलढाणा : प्रेमात आणाभाका घेतल्या जातात. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू माझी झाली नाही, तर कुणाचीही होऊ नये, अशी काही युवकांची अपेक्षा असते. पण, याला कुठतरी छेद दिला जातो. आज याच्याशी तर उद्या त्याच्याशी तिची किंवा त्याची जवळीकता दिसते. यातून काही जण नैराश्यात जातात. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. एका २६ वर्षीय युवकाचं एक युवतीवर प्रेम होते. पणष तिने काही दिवसांनी दुसऱ्याशी जवळीकता केली. ही गोष्ट युवकाला सहन झाली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला. आता कसं जगायचं असं त्याला वाटू लागलं. त्यातून त्याने टोकाचा निर्णय घेतला. पण, त्यापूर्वी त्यानी व्हॉट्सअप आणि इंस्टावर स्टेटस ठेवला. त्यातून त्याने स्वतःला का संपवलं, हे सांगितलं.

मंदिर परिसरात झाडाला लावला गळफास

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात येत असलेल्या देऊळगाव मही येथील 26 वर्षीय युवकाने स्वतःचा संपवलं. आपल्याला गर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून आत्महत्या केली. गजानन गुरव असं या 26 वर्षीय युवकाचे नाव आहे. गावातीलच एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र या युवतीने दुसऱ्याशी आपलं नातं जुळवलं. त्यामुळे नैराश्यातून गजानन गुरव याने खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास लावला.

हे सुद्धा वाचा

भावनिक स्टेटस ठेवला

आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला. गजाननने आपल्या व्हॉट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्रामच्या स्टेटसवर व्हिडिओ ठेवत स्वतःला संपवलं. आपल्या मित्र परिवाराला भावनिक स्टेटससुद्धा गजाननने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते. त्यामुळे गर्लफ्रेंडने प्रेमात धोका दिला. “अपनी राणी किसी की दीवानी हो गई”, मी मेल्यावर आठवण काढशील माझी?, असं म्हणत गजानन गुरव या युवकाने आपली जीवनयात्रा संपवली.

सामाजिक कार्यात होता अग्रेसर

या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक गजानन गुरव हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचा शहर अध्यक्ष होता. त्याने राजकीय सामाजिक क्षेत्रात आपला मित्र परिवार जोडला होता. तो नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहायचा. समाजात वावरत असताना अशा घटना घडत असतात. त्यातून आपण सावरलं पाहिजे, असं त्याला वाटलं नाही. त्यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.