नको तिथे स्टंटबाजी करणे महागात पडले, चालत्या बोटीतून पाण्यात उडी मारली अन्…

पाच तरुण पर्यटनस्थळी फिरायला गेले. तेथे नौका विहार करत असतानाच दोन तरुणांना स्टंटबाजी करण्याची हौस आली. मग ही हौस एकाला चांगलीच महागात पडली.

नको तिथे स्टंटबाजी करणे महागात पडले, चालत्या बोटीतून पाण्यात उडी मारली अन्...
स्टंटबाजी करताना तरुण पाण्यात बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 10:00 AM

बुलढाणा : मित्रांसोबत पिकनिकला गेलेल्या तरुणलाा स्टंटबाजी करणे चांगलेच महागात पडले आहे. स्टंटबाजी करताना तरुण पाण्यात बुडाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात घडली. रोशन इंगळे असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत रोशनचा मृतदेह सापडला नव्हता. आज पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. स्टंटबाजी करण्याच्या नादात रोशनने पाण्यात उडी घेतली आणि तो बुडाला. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नौका विहार करताना स्टंटबाजी

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद स्मारक आणि कन्याकुमारी परिसर पाहण्यासाठी काल दुपारी चिखली तालुक्यातील पाच युवक गेले होते. त्याठिकाणी नौका विहार करताना नावेमध्ये काही मुली सुद्धा होत्या. यावेळी मुलींसमोर शाईनिंग मारण्यासाठी रोशन इंगळे आणि आदेश इंगळे हे दोन तरुण बेटाच्या मागे 50 फूट अंतरावर नौका चालू असताना स्टंटबाजी करत होते. बोट चालकाने त्यांना स्टंटबाजी करू नका म्हणून सांगितले.

बेपत्ता तरुणाचा शोध सुरु

मात्र त्या दोघांनी बोट चालकाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत चालत्या बोटीतून पाण्यात उड्या घेतल्या. तरुण पाण्यात पडल्याचे पाहताच चालकाने बोट पुन्हा पाण्यात आणली आणि तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदेश इंगळे या तरुणाला वाचवण्यात नौका चालकाला यश आले. मात्र 22 वर्षीय रोशन इंगळे हा तरूण पाण्यात बुडाला. त्याचा अद्यापही शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...