प्राध्यापिका घराला कुलूप लावून कॉलेजमध्ये गेल्या; घरी परतल्या तेव्हा त्यांना धक्का बसला
प्राध्यापिका सकाळी घराला कुलूप लावून कॉलेजमध्ये गेल्या. तिथं त्यांनी लेक्चर दिलं. त्यानंतर त्या घरी आल्या. तेव्हा त्यांना धक्का बसला. घराचे दार तुटले होते.
बुलडाणा : शेगाव येथील प्राध्यापिका सकाळी घराला कुलूप लावून कॉलेजमध्ये गेल्या. तिथं त्यांनी लेक्चर दिलं. त्यानंतर त्या घरी आल्या. तेव्हा त्यांना धक्का बसला. घराचे दार तुटले होते. घरात सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यामुळे घाबरल्या. त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू तपासल्या तेव्हा त्या दिसल्या नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस आता घटनेचा तपास करत आहेत. खामगाव येथे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या महिलेचे शेगाव येथील घर अज्ञात चोरांनी फोडले.
प्राध्यापिका किरायाने राहत होत्या
घरातील ३ लाख ३८ हजाराचा मुद्द्यामाल लंपास केला. ही घटना २० मार्च रोजी दुपारी स्थानिक रोकडियामधील महेशनगरात घडली. शेगाव येथील रिता भास्करराव काळे (वय ३५ वर्षे) या रोकडीया महेशनगर बजाज शोरूमजवळ प्रदीप तुळशीराम दंदी यांच्याकडे भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत.
घराचे कुलूप तुटलेले होते
खामगाव येथील पॉलटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत . त्या २० मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता घराला कुलूप लावून ड्युटीसाठी गेल्या. त्यानंतर काम संपवू दुपारी २.३० वाजता त्या घरी आल्या. यावेळी घराचे दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले. खोलीतील दोन्ही लोखंडी कपाटाचे दरवाजे तुटलेले आणि कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
हा माल केला लंपास
कपाटामध्ये ठेवलेले नगदी २७ हजार रुपये कानातले चार जोड सोन्याचे अंदाजे १५ ग्रॅम किंमत अंदाजे ७५ हजार, मंगळसूत्र अंदाजे १२ ग्रॅम किंमत ६२ हजार दिसले नाही. सोन्याची अंगठी अंदाजे ५.५ ग्रॅम किंमत २५ हजार रुपये, सोन्याची चैन ५० हजार, सोन्याची पोथ १० ग्रॅम किंमत ६० हजार, सोन्याची अंगठी २.५ ग्रॅम किंमत १५ हजार हे चोरी गेले होते.
छोटे पेंडल २.५ ग्रॅम किंमत १० हजार चांदीचे जोडवे दोन जोड दोन तोरड्या किंमत २ हजार, SAMSUNG GALAXY जे ५-६ कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाइल किंमत १२ हजार हे गायब झाले होते. एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लंपास केला. तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम गुन्हा दाखल केला आहे.