Buldhana Lightning : बुलढाण्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, दोन जण जखमी

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी गाव शिवारात शुभम हेलगे यांच्या शेतात क्रेनद्वारे विहिरीचे खोदकाम सुरू होते. काम आटोपून सर्वजण घराकडे निघाले असता अचानक विजेच्या गडगडासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी सर्वांनी झाडाचा आसरा घेतला. मात्र पाऊस सुरू असताना झाडावर वीज कोसळली.

Buldhana Lightning : बुलढाण्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, दोन जण जखमी
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 11:28 PM

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील पळशी झाशी गाव शिवारात पाऊस सुरू असताना वीज (Lightning) पडून 2 जण ठार (Death) तर दोघे जण जखमी (Injured) झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. संजय उत्तम मारोडे (55) आणि रवि संजय भालतडक (35) अशी वीज पडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर मंगेश मनोहर बाखरे आणि बंडु मधुकर मारोडे अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेतातील काम आटोपून सर्व जण घरी जात असताना ही दुर्घटना घडली. मृतक संजय उत्तम मारोडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तर रवि संजय भालतडक यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

झाडाखाली उभे असताना वीज कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी गाव शिवारात शुभम हेलगे यांच्या शेतात क्रेनद्वारे विहिरीचे खोदकाम सुरू होते. काम आटोपून सर्वजण घराकडे निघाले असता अचानक विजेच्या गडगडासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी सर्वांनी झाडाचा आसरा घेतला. मात्र पाऊस सुरू असताना झाडावर वीज कोसळली. यात संजय मारोडे आणि रवि भालतडक या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पावसामुळे आपले अंगावरील कपडे ओले होवू नये याकरीता कपडे आणण्याकरता गेलेले मंगेश बाखरे आणि बंडु मारोडे जखमी झाले. जखमींना गावातील लोकांनी संग्रामपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर शेगावला उपचारासाठी हलवण्यात आले. (Two killed, two injured in lightning strike in buldhana)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.