Buldana Crime | शेगावात दोन बलात्काराच्या घटना! पोलिसाचा महिला पोलिसावर तर दुसऱ्या घटनेत सैनिकाचा घटस्फोटितेवर अत्याचार

एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पीडित महिलेने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. आरोपी आशिषकुमार बन्सीलाल परदेशी हा एकफळ येथील रहिवासी आहे. सद्यस्थितीत तो सैन्य दलात नोकरी करीत आहे. आरोपीने तिच्यावर 2016 पासून 31 मे 2022 पर्यंत वेळोवळी शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. त्यामुळे आरोपीपासून फिर्यादी गर्भवती राहून तिला मुलगा झाला.

Buldana Crime | शेगावात दोन बलात्काराच्या घटना! पोलिसाचा महिला पोलिसावर तर दुसऱ्या घटनेत सैनिकाचा घटस्फोटितेवर अत्याचार
शेगावात दोन बलात्काराच्या घटनाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 11:35 AM

बुलडाणा : जिल्ह्यातील शेगावात दोन बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. एका घटनेमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच अत्याचार केलेला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अमरावतीतील महिला पोलीस कर्मचार्‍याने तिच्या पतीसह येवून शेगाव (Shegaon) येथील शहर पोलीस स्टेशनलाला आल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तक्रार दिलीय. आरोपी पोलीस शिपाई आकाश वाघमारे (Akash Waghmare) हा रामदासपेठ पोलीस स्टेशन अकोला येथे कार्यरत आहे. पीडित आणि आरोपीने पोलीस दलात प्रशिक्षण (Training in Police Force) घेतलेले आहे. त्यामुळं त्यांची एकमेकांशी ओळख होती. त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू होते.

शेगावात लॉजवर अत्याचार

डिसेंबर 2021 या मध्ये आरोपी पोलीस शिपाई आकाश वाघमारे याने पीडित पोलीस कर्मचारी महिलेला फोन केला. तिला बोलावून शेगावला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केलाय. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझे पतीला जिवाने ठार मारून टाकीन, अशी धमकी सुद्धा दिली. त्यानंतर पुन्हा तो पीडितेला शरीरसुखाची मागणी करत होता. म्हणून मग पीडित महिलेने पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे पोलीस शिपाई आकाश वाघमारे याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 376, 377, 506 भादंविनुसार गुन्हा दाखल केलाय. अशी माहिती मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांनी दिली.

शरीरसंबंधानंतर सैनिकाचा लग्नास नकार

दुसऱ्या घटनेत एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पीडित महिलेने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. आरोपी आशिषकुमार बन्सीलाल परदेशी हा एकफळ येथील रहिवासी आहे. सद्यस्थितीत तो सैन्य दलात नोकरी करीत आहे. आरोपीने तिच्यावर 2016 पासून 31 मे 2022 पर्यंत वेळोवळी शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. त्यामुळे आरोपीपासून फिर्यादी गर्भवती राहून तिला मुलगा झाला. मात्र त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला लग्नास नकार दिला. त्यामुळं शेगाव पोलिसांत तक्रार देण्यात आलीय. यावरून आरोपी विरुद्ध कलम 376, सह विविध कलमान्वये गुन्हा दखल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.